Join us

राज्यात केवळ 42 कारखान्यांचे तीन कोटी मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 9:37 AM

राज्यातील ४२ साखर कारखान्यांचे ५ लाखांपेक्षा अधिक व एकूण तीन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे.

अरुण बारसकर 

सोलापूर : राज्यात २०७ साखर कारखान्यांचे साडेसात कोटी मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून, त्यामध्ये ४२ साखर कारखान्यांचे ५ लाखांपेक्षा अधिक व एकूण तीन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. राज्यातील चार कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दरम्यान, अवेळी झालेल्या aपावसाने उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल, असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. 

राज्यात यंदाच्या गाळप हंगामासाठी १४ लाख हेक्टर उसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या २०७ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला असून, गुरुवारपर्यंत ७४८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. २०७ साखर कारखान्यांनी गाळप घेतले असले, तरी अधिक क्षमतेच्या ४२ कारखान्यांनी तीन कोटींपेक्षा अधिक गाळप केले आहे. उर्वरित १६५ साखर कारखान्यांचे चार कोट मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या तक्त्यावरून समोर आले आहे.

पुणे विभागात गाळप 

राज्यात पुणे जिल्ह्यातील चारामती अॅग्रो चे सर्वाधिक १५ लाख ३४ हजार, 'दौड शुगरचे १४ लाख, तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव हिंदे कारखान्याचे १२ लाख १० हजार, कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर हुपरी, हात- कणंगलेने १० लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. राज्यात ४० साखर कारखान्यांचे प्रत्येकी ५ लाखांपेक्षा अधिक मेट्रिक टन गाळप झाले असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ८, सोलापूर व पुणे जिल्‌ह्यातील प्रत्येकी ६, सातारा जिल्हा ५, सांगली व अह‌मदनगर प्रत्येकी ४, परभणी व बीड जिल्ह्यांत प्रत्येकी २, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार जिल्ह्यांतील प्रत्येकी एका साखर कारखान्याने ५ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील गाळप 

सोलापूर जिल्ह्यातील आष्टी शुगर, मोहोळ, रामेश्वर सहकारी, भोकरदन, संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर, टोकाई, पुरंदा, वसमत या कारखान्यांचा पट्टा पडला आहे.राज्यातील कोल्हापूर विभागाचे (कोल्हापूर व सांगली जिल्हे सर्वाधिक १७० लाख, पुणे विभागाचे (पुणे व सातारा जिल्हे) १६० लाख, तर सोलापूर विभागाचे सोलापूर व धाराशिव) १५१ लाख मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीसाखर कारखानेऊसशेतकरी