Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > भात गिरणीतून शेतकरी तरुणांसाठी घरबसल्या रोजगार, काय आहेत वैशिष्टये?

भात गिरणीतून शेतकरी तरुणांसाठी घरबसल्या रोजगार, काय आहेत वैशिष्टये?

Latest News Employment for Farmer Youth through Mini Rice Mill | भात गिरणीतून शेतकरी तरुणांसाठी घरबसल्या रोजगार, काय आहेत वैशिष्टये?

भात गिरणीतून शेतकरी तरुणांसाठी घरबसल्या रोजगार, काय आहेत वैशिष्टये?

घरगुती भाताची गिरणी आणि भात मळणी यंत्र या दोन्ही यंत्राद्वारे घरबसल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे.

घरगुती भाताची गिरणी आणि भात मळणी यंत्र या दोन्ही यंत्राद्वारे घरबसल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकरी तरुणांसाठी रोजगारासाठी अनेक संधी उपलब्ध असून त्यातलंच एक म्हणजे घरगुती भाताची गिरणी आणि भात मळणी यंत्र. आवाक्यात असलेल्या या दोन्ही यंत्राद्वारे घरबसल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांना हे दोन्ही यंत्र फलदायी ठरणार आहे. 

घरगुती राईस मिल

दरम्यान तांदूळ काढण्यासाठी भात राईस मिलमध्ये नेले जाते. मात्र आता घरगुती प्रकारातील राईस मिल रोजगाराच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. मिनी राईस मिल ही 150 किलो वजनाची असून सिंगल फेजवर चालणारी आहे. एकावेळी 30 ते चाळीस किलो भात आत घेण्याची क्षमता या राईस मिलमध्ये आहे. तसेच तासाला चार ते पाच पोते म्हणजे जवळपास 2 क्विंटल भात काढला जाऊ शकतो. त्यामुळे घरबसल्या सामान्य शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. शिवाय अनेक तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. याची किंमत तीस हजार इतकी आहे. 

भात मळणी यंत्र 

तर दुसरे भात मळणी यंत्र याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकदा मजुरांची टंचाई असल्याने भात कापण्यापासून ते थेट गोण्यांमध्ये भरेपर्यंत मशिन्स आल्या आहेत. यातीलच एक मशीन म्हणजे भात मळणी यंत्र. भात कापून झाल्यावर भाताच्या पेंढ्या बांधल्या जातात.  या पेंढ्या थेट या यंत्रात टाकून आपण साळ जमा करू शकतो. हे इंजिन मशीन असून एक तासाला, एक लिटर पेट्रोलमध्ये  100 ते 150 किलो साळ काढली जाऊ शकते.  या मशीन्समध्ये दोन प्रकार असून एक हाफ ग्रीड तर दुसरी फुल ग्रीड स्वरूपात आहे. हाफ ग्रीड मशीन 45 हजार रुपये तर फुल ग्रीड मशीन 45 हजार रुपयांना विक्री केली जात आहे. 

हे दोन्ही यंत्र पुण्यातील किसान एक्सपोमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

Web Title: Latest News Employment for Farmer Youth through Mini Rice Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.