Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी बांबू शेती शेतकऱ्यांसाठी वरदान!

कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी बांबू शेती शेतकऱ्यांसाठी वरदान!

maharashtra agriculture farmer bamboo farming which gives more income lower cost | कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी बांबू शेती शेतकऱ्यांसाठी वरदान!

कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी बांबू शेती शेतकऱ्यांसाठी वरदान!

भारतात विविध राज्यात विविध पिके घेतली जातात. त्यामध्ये बागायती आणि कोरडवाहू जमिनीमध्ये पाण्याच्या आणि पावसाच्या उपलब्धतेनुसार पिकांचे उत्पादन घेतले जाते.

भारतात विविध राज्यात विविध पिके घेतली जातात. त्यामध्ये बागायती आणि कोरडवाहू जमिनीमध्ये पाण्याच्या आणि पावसाच्या उपलब्धतेनुसार पिकांचे उत्पादन घेतले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

भारतात विविध राज्यात विविध पिके घेतली जातात. त्यामध्ये बागायती आणि कोरडवाहू जमिनीमध्ये पाण्याच्या आणि पावसाच्या उपलब्धतेनुसार पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, त्याला दर मिळेल का नाही याची निश्चितता नसते. त्यातुलनेत बांबूची लागवड फायद्याची ठरते. यामधून बांबू शेतीतून मोठा फायदा मिळू शकतो.

-सूर्यकांत किंग्रे

डोंगर उताराची जमीन, अतिवृष्टी, निर्सगाचा लहरीपणा यामुळे दिवसेंदिवस भात शेती धोक्यात येत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न देणारी बांबू शेती. या शेतीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यामधून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. भोर तालुका दुर्गम डोंगरी तालुका आहे. या तालुक्यातील पश्चिम भागात भात हे मुख्य पीक असले तरी बांबू हे पीकसुद्धा तितकेच महत्त्वाचे पीक आहे.

मात्र, निर्सगाच्या लहरीपणामुळे भात शेती दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. त्यामुळे या पश्चिम भागात बांबूसाठी पोषक जमीन व वातावरण असल्याने या भागात बांबूची वाढ चांगली होत आहे. त्यामुळे हमखास आर्थिक उत्पन्न मिळणारे साधन म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी बांबूकडे पाहत आहेत. मात्र, शासनाकडून लक्ष देण्याची गरज आहे.

भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरण भागातील हिर्डशी व वेळवंड खोऱ्यात व भुतोंडे या डोंगराळ खोऱ्यातील गावात बांबूची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत. हा पश्चिम भाग नीरा देवघर व भाटघर धारणाच्या पाण्याने व्यापला असल्याने शेतजमिनी पाण्याखाली जास्त गेल्या आहेत.त्यात राहिलेला भाग हा डोंगराळ उत्पन्नाचे साधन पाण्यात गेल्याने लागणारी भटकंती थांबेल, शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारेल. बांबू जलद गतीने वाढणारी असणारी शेती अल्प असल्याने सदाहरित, दीर्घायु वनोपज आहे.

याचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. कमी जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. त्यामुळे उत्पन्नाचे साधन असणारी शेती अल्प असल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईसह कोकणासारख्या ठिकाणी जावे लागत आहे. तर काही लोक गावातच राहुन आपली उपजिविका भागवत आहेत. स्थानिक रोजगार नाही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हमखास उत्पन्न असणाऱ्या बांबू शेतीकडे वळाला आहे.

दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांकडे वाढलेला बांबू व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पहिजे त्याप्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचे चित्र आहे. येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी एखादा बांबु प्रकल्प बांबुपासुन वस्तु बनविण्याचा कारखाना यामुळे महिलांना तरुणांना रोजगार मिळेल आर्थिक फायदा होईल. येथील नागरिकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, कोकणसारख्या ठिकाणी जावे लागत आहे, तर काही लोक गावालाच राहून मिळेल तो कामधंदा करून आपली उपजीविका भागवत आहेत.

जास्तीत जास्त फायदा

रोजगार नाही, उत्पन्नाचे साधन नाही, त्यामुळे लागवड करता येते, विविध वस्तू, कागद उद्योग, वाद्य निर्मिती आणि खाद्य आदीसाठी बांबूचा वापर केला जाईल यासाठी राजकीय नेते मंडळींनी सदर बांबू शेतीकडे लक्ष देऊन रोजगाराची संधी निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

रोजगार उपलब्ध झाल्यास शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारेल. बांबू पिकासाठी एका हेक्टरसाठी ५५ मीटर अंतरावर ४०० रोपांसाठी १ लाख १२ हजार ३६० रुपये इतके शासकीय अनुदान दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी कलेले आहे.

बांबूविषयी जनजागृतीची गरज

हमखास उत्पन्न मिळणारे साधन असून सुद्धा कृषी, वन विभाग या बांबू विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत. खरं तर बांबूचा योग्य मोबदला मिळण्यासाठी बांबूपासून वस्तू निर्मितीसंबंधी जनजागृती करणे गरजेचे असून कृषी, वन, तसेच बांविषयी शासकीय संस्था यांनी या भागात येऊन कार्यशाळा भरवून बांबू संबंधित असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यापासून भागातील शेतकरी, युवक व महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत कली पाहिजे.

कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने तसेच बांबू प्रमोशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने मेस बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आवश्यक असलेले रोपांसाठी रोपवाटिका उभारल्या असून मोठ्या प्रमाणामध्ये रोपांची उपलब्धता झाल्यास हिरडस मावळा मध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून स्थानिक रोजगार व उत्पन्नात वाढ होऊ शकते. 
- संतोष दिघे, प्रगतशील शेतकरी

Web Title: maharashtra agriculture farmer bamboo farming which gives more income lower cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.