महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ‘कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी’ विभागाने विविध अवजारे, यंत्रे विकसित करून त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन तयार केलेल्या यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ व मजूरबळ कमी करण्याचे प्रयत्न झाले आहेत.
ट्रॅक्टरचलित फुले अॅटोमॅटिक पल्टी नांगरठळक वैशिष्टयेः- ४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.- ट्रॅक्टरच्या पोजिशियन कंन्ट्रोललिव्हर ने अॅटोमॅटिक पलटी करता येतो.- या नांगरामध्ये पल्टी करण्याकरीता मेकॅनिकल लिव्हर तसेच हायड्रोलिक सिलेडरची आवश्यकता नाही.- या नांगरांची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८०.४५ टक्के इतकी आहे.- या नांगरासाठी हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो.- या नांगराची मुळ किंमत हायड्रोलिक नांगराच्या किंमतीपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी कमी आहे.- या नांगराने जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यत करता येते तसेचहा नांगर हलक्या मध्यम व भारी जमिनीकरीता उपयुक्त आहे.
ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो - मेकॅनिक नियंत्रित फळबाग ऑफसेट व्यवस्थापन यंत्रठळक वैशिष्टयेः- ३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.- बागामध्ये एकाच वेळी जुनी मुळे कापण्यासाठी व बेड तोडण्यासाठी उपयुक्त.- पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात ४८ टक्के बचत.- क्षमता ०.१२७ हेक्टर प्रति तास.
ट्रॅक्टरचलित फुले कुटटी यंत्रठळक वैशिष्टयेः- ३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते- फळबागेतील छाटणी नंतर पडणा-या अवशेषांची कुटटी करुन बेडवर दोन्ही बाजुस समांतर टाकण्याकरीता उपयुक्त. उदा- द्राक्षे- अवशेषांची कुटटी करण्याकरीता ट्रॅक्टरच्या पी टी ओ शक्तीचा वापर केला आहे तर कुटटी केलेलया अवशेषांची बेडवर दोन्ही बाजुस समांतर टाकण्याकरीता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.- प्रक्षेत्रीय क्षमता ७८ टक्के- एका तासात ०.४७ हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुटटी करुन टाकते.- पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्के बचत.
ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्रठळक वैशिष्टयेः- २५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.- फळ बागेतील झाडांच्या दोन ओळीतील तसेच दोन झाडांच्या मधल्या जागेतील तण काढण्यासाठी उपयुक्त.- या यंत्राचे रोटरी युनीट दोन झाडांच्या मध्ये व बाहेर हायडो-मेकॅनिकल यंत्रनेद्वारे सहजपणे कार्य करते.- प्रक्षेत्रीय कार्य क्षमता एका दिवसात सव्वा हेक्टर आहे.
ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुर्नलागवड यंत्रठळक वैशिष्टयेः- ४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते- एका दिवसात २.७५ ते ३.०० हेक्टर क्षेत्रावर ऊस रोपांची पुर्नलागवड करता येते.- पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचत होते- पारंपारिक पध्दतापेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के
विद्युत मोटारचलीत फुले ऊस बेणे तोडणी यंत्रठळक वैशिष्टयेः- एक अश्वशक्तीच्या व सिंगल फेज विद्युत मोटार चलीत यंत्र- एका तासात ६५०० ऊस बेणे तयार करता येते- पारंपारीक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये ८० ते ८५ टक्के बचत- पारंपारीक पध्दतीपेक्षा वेळेमध्ये ८५ ते ९५ टक्के बचत- ऊस रोपवाटीकेसाठी ४० ते ७० सें.मी. लांबीचे ऊस बेणे तयार करण्यासाठी उपयुक्त
फुले शेवगा काढणी झेलाठळक वैशिष्टयेः- एका तासात २५० ते २८० शेंगा काढता येतात.- शेंगाला इजा होत नाही.- उंच झाडावरील शेंगा काढण्यासाठी उपयुक्त.
विद्युत मोटारचलीत औषधी वनस्पतीच्या फळांचे कवच फोडणी यंत्रठळक वैशिष्टयेः- या यंत्राद्वारे हिरडा व रिठा या औषधी वनस्पतींच्या फळांचे कवच फोडता येते.- पारंपारीक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये व वेळेमध्ये ५० ते ६० टक्के बचत- या यंत्राद्वारे एका दिवसात ३०० किलो औषधी वनस्पतींच्या फळांचे कवच फोडता येते.
ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजारठळक वैशिष्टयेः- ३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते- एका दिवसात ४.०० ते ४.५० हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात.- रब्बी ज्वारीसाठी जमीनीत पावसाचे पाणि मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करता येतात.
विद्युत चलित कडबा कुटटी यंत्रठळक वैशिष्टयेः- लहान व मध्यम शेतकऱ्यासाठी विद्युत चलित- कडबा कुटी यंत्र.- सिंगल फेज एक अश्वशक्ती विद्युत मोटार चलित यंत्र.- ओला चारा तसेच कोरडा चारा कुटटी करण्यासाठी उपयुक्त.
ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगरठळक वैशिष्टयेः- मोल नांगरासाठी सुमारे २५००० इतका खर्च येतो.- मोल नांगराने मोल निचरा करण्यासाठी हेक्टरी रु. १५०० इतका खर्च येतो.- मोल नांगर ६० ते ७२ एच. पी. ट्रॅक्टरद्वारे ओढता येतो.- मोल नांगराचा उपयोग भारी काळया जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा आणि क्षारांचा निचरा करण्यासाठी होतो.- या यंत्राद्वारे दोन मोलमध्ये ४ मिटर अंतर ठेवलयास प्रतितासाला ०.३ हेक्टर क्षेत्र करता येते.
अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पडॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)