Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > जंगली प्राण्यांपासून वाचवा आपली पिके; पहा सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र

जंगली प्राण्यांपासून वाचवा आपली पिके; पहा सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र

Protect your crops from wild animals; Check out Solar Powered Animal Repellents | जंगली प्राण्यांपासून वाचवा आपली पिके; पहा सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र

जंगली प्राण्यांपासून वाचवा आपली पिके; पहा सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र विकसित केले आहे. सन २०२३ च्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेत या यंत्राच्या शिफारशीस वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांची संरक्षण करण्याकरीता मान्यता मिळालेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतातील पीक जेव्हा अंकुर, रोप या अवस्थेत असते तेव्हा जंगली वन्यप्राणी उदा. हरीण, रानगाय, नीलगाय, रानडुक्कर इ. हे मुख्यतःवे रात्रीच्या वेळेला पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान करतात. ज्यामुळे शेतीमधील पिकमळाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. प्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हा एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय आहे.

सदर यंत्रामध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरी, डी. सी. मोटर, एल ई डी लाईट आणि स्पीकर यांचा समावेश आहे. यंत्राच्या वरच्या बाजूला असलेले सौर पॅनल, सौर ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करते, जी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये साठवली जाते. हि बॅटरी एल ई डी लाईट व डी. सी. मोटरला ऊर्जा पुरवते आणि ती लाईट ला १० आरपीएम वर फिरवते तसेच स्पीकर वर ५ मिनिटांच्या अंतराने १० सेकंद पर्यंत आवाज करते. यंत्रांतील मोटर एल ई डी लाईट ला वर्तुळाकारामध्ये फिरवते त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवी उपस्थितीची जाण होते तसेच स्पीकर चा आवाज ऐकून वन्यप्राणी घाबरून दूर पळतात. अशा प्रकारे हि प्रणाली शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

वैशिष्ट्ये
-
सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे यंत्र आहे. यासाठी सयंत्रातील बॅटरी हि सोलर फोटोव्होल्टिक पॅनल द्व्यारे चार्जिंग केली जाते व पर्यायाने विजेची बचत होते. 
- हे यंत्र पूर्णतः स्वयंचलित असून सूर्यास्त झाल्यावर सुरु होते व सूर्योदय झाल्यावर बंद होते.
- या यंत्रावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही.
- सदर यंत्र हे विना प्राणघातक नियंत्रण तंत्र आहे जे सौर उर्जेवर चालते जे पिकांचे नुकसान टाळते किंवा कमी करते तसेच जनावरांची शेतात प्रवेश करण्याची इच्छा कमी करते.
- एक यंत्र हे २ हेक्टर क्षेत्रफळा पर्यंत कार्य करू शकते.

वापर व देखरेख
-
सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र शेतातील पिकाच्या मध्यभागी ठेवण्यात यावा.
शेतात ठेवा अगोदर इलेक्ट्रॉनिक सर्किट वरील बटन सुरु (ऑन) करून ठेवावे.
- यंत्राची उंची हि पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट उंच असावी.
- धुके व ढगाळ वातावरण असल्यास दिवसा इलेक्ट्रिक पोर्ट लावून ६-७ तास यंत्राची बॅटरी चार्जिंग करून घ्यावी.

डॉ. सुरेंद्र काळबांडे
अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय
सागर पाटील
इन्क्युबेशन मॅनेजर, आर आय एफ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

Web Title: Protect your crops from wild animals; Check out Solar Powered Animal Repellents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.