Join us

Subsoiler : सबसॉयलरने फोडा मातीचा कठीण थर! फायदे ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 2:57 PM

या थरामुळे शेतजमिनीत पाणी मुरत नाही. परिणामी आपल्या मातीचे यामुळे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सबसॉयलर नावाचे यंत्र कामी येते.

शेती व्यवसायामध्ये ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  त्यामध्ये नांगरणी, रोटर, मोगडा, वखरणी आणि इतर कामेसुद्धा ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रीलर या यंत्राद्वारेच केले जातात. त्यामुळे शेतीमध्ये ठराविक अंतरावर एक कठीण मातीचा थर तयार होतो. या थरामुळे शेतजमिनीत पाणी मुरत नाही. परिणामी आपल्या मातीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सबसॉयलर नावाचे यंत्र कामी येते.

दरम्यान, क्षारयुक्त पाणी, शेतीत यंत्रांचा वापर आणि रासायनिक खतांच्या अती वापरामुळे जमिनीमध्ये ९ ते १० इंचावर कठीण मातीचा थर तयार होत असतो. तर पाऊस पडल्यानंतर या कठीण थरापर्यंत पाणी मुरते आणि त्यानंतर जमीनीत पाणी न मुरता जमिनीच्या बाहेर निघून जाते. तो कठीण मातीचा थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा उपयोग होतो. हा कठीण स्थर फोडला तर पावसाचे पाणी जमिनीत चांगल्या पद्धतीने मुरण्यास मदत होते.

सबसॉयलरचा वापर कसा करावा?सबसॉयलर हे एक नांगरासारखे यंत्र असून त्याला एकच पोलादी किंवा लोखंडी सरळ फाळ असून तो जमिनीमध्ये दोन ते तीन फुटापर्यंत खोल जातो. ट्रॅक्टरद्वारे या सबसॉयलरने चार ते पाच फुटाच्या अंतरावरून रेषा पाडायच्या. त्याचबरोबर हा ट्रॅक्टरच्या पीटीओवर चालतो, त्यामुळे हा फाळ कायम व्हायब्रेट होत असल्यामुळे दोन्ही बाजूची जमीन मोकळी होते.

सबसॉयलर वापराचे फायदेसबसॉयलर वापरामुळे जमिनीतील हार्ड पॅन म्हणजे कठीण मातीचा थर फोडून निघतो आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरते. त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. त्याचबरोबर मातीच्या वरच्या थरामध्ये असलेले क्षारही खाली जातात. शेतात विहीर किंवा बोअर असेल तर त्याचे आपोआपच पुनर्भरण होते आणि आपल्या जमिनीतील पाणी जमिनीतच मुरले जाते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती