Join us

Irale शेतकऱ्यांचा पारंपरिक रेनकोट इरले होतेय आता दृष्टिआड; कसं बनवलं जातं इरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 2:22 PM

पावसात शेतीची कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती इरले तयार करण्याचे काम पावसापूर्वी करीत असे. इरले दोन प्रकारांत बनवले जाते.

कुडूस: पावसात शेतीची कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती इरले तयार करण्याचे काम पावसापूर्वी करीत असे. इरले दोन प्रकारांत बनवले जाते. पुरुष व महिलांसाठी वेगवेगळे आकार असायचे, मात्र आज रेनकोट आणि मेनकापडाने इरल्याची जागा घेतली आहे.

गेल्या पंधरा वर्षापासून इरल्याची जागा रेनकोट आणि मेनकापडाने घेतली आहे. पंधरा वर्षापूर्वी जेवढी माणसे शेतीकामात असतील तेवढी इरली तयार करण्यात येत. इरले तयार करण्यासाठी बांबूपासून छोट्या पात्या काढून त्यांचे महिला व पुरुषांसाठी वेगळ्या आकाराचे इरले विणले जाते.

इरल्यावर पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी पळसाची सुकलेली पाने लावून, सुतळीने घट्ट वीण केली जाते. त्यामुळे वारा पावसात पाने पडत नाहीत. दोन्ही प्रकारची इरली पावसाच्या थंडीत शरीराला ऊब देतात पाण्यापासून संरक्षण करतात.

पळसाची पाने दुर्मीळ• घरातील मोठी व्यक्ती इरले तयार करीत असे, तर कुटुंबातील व्यक्ती उन्हाळ्यात जंगलातील पळसाच्या झाडाची पाने आणून सुकवीत असत. ठाणे, पालघर जिल्ह्यांतून जरी डरले दृष्टिआड झाले असले तरी कोकणातीलशेतकरी आजही डरले वापरतात.• शहरीकरण झाल्याने व अनेक उद्योगधंदे आल्याने ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जंगल नामशेष होत असून, अनेक बहुपयोगी वृक्ष नष्ट झाले आहेत. बांबू आणि पळसाची पाने दुर्मीळ झाल्याने डरलेही दृष्टीआड गेले आहे

अधिक वाचा: शेती आधारित या व्यवसायांसाठी महिलांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कसा कराल अर्ज

टॅग्स :शेतकरीशेतीकोकणपाऊसभातपेरणीलागवड, मशागत