Join us

महाराष्ट्रातील शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरचीसाठी लानेवो कीटकनाशक का वापरत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 12:20 PM

Dhanuka's Lanevo insecticide:वांगी, टोमॅटो आणि मिरीची पिकांतील कीडींचा प्रभावी बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी धानुकाचे लानेवो कीटकनाशक वापरत आहेत, जाणून घेऊया त्यांचे अनुभव.

‘‘मी साधारण गेल्या १० वर्षापासून वांगी हे पीक घेत आहे. या पिकावर पांढरी माशी आणि अळी  पडली होती. त्यावर उपाय शोधताना धानुका कंपनीच्या लानेवोबद्दल समजले आणि उत्सुकता वाटून ते कीटकनाशक (Dhanuka's Lanevo insecticide) मी  शेतात फवारले. त्यानंतर वांगी पीकातील अळी, पांढरी माशी यांचा नायनाट झाला असून पीकाची गुणवत्ता सुधारली आहे, हिवरगाव पावसा येथील तरुण शेतकरी सतीश पावसे सांगत होते. लानेवो कीटकनाशकाचा त्यांना फायदा झाल्याने आगामी काळात त्यांच्या उत्पादनात वाढ होईल असा विश्वास त्यांना वाटतोय.

श्री. पावसे यांच्याप्रमाणेच राज्यातील हजारो भाजीपाला शेतकरीलानेवो कीटकनाशकाला पसंती देताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे वांगी, मिरची आणि टोमॅटोवरील कीडींचा होणारा प्रभावी बंदोबस्त. कृषी उत्पादनातील प्रमुख कंपनी असणाऱ्या धानुका ॲग्रोटेकने जपानी कंपनी निसान केमिकल्स कॉर्पेारेशन यांच्यासोबत संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी लानेवो हे कीटकनाशक आणले आहे. यातील नव्या आणि आधुनिक तंत्रामुळे भाजीपाल्यावरील रसशोषक कीटक व अळ्यांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी ते उपयुक्त ठरले असून शेतकऱ्यांचा सध्या या नव्या कीटकनाशक वापराकडे ओढा दिसून येत आहे. 

आपल्या शेतात कीडींचा बंदोबस्त करण्यासाठी लानेवो कीटकनाशक वापरल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले आहेत. प्रशांत नवले, रा. जिनकी, ता. फलटण, जि. सातारा यांनी सांगितले की त्यांनी दोन एकर शेतात  वांगी हे पीक घेतले आहे. या पीकात अळी, पांढरी माशी पडली होती. यावर उपाय म्हणून यूटुबला सर्च करून धानुका कंपनीचे लानेवो औषध आहे हे समजले. ते कीटकनाशक फवारल्यावर पिकातील पांढरी माशी, अळी गळून पडली, त्यामुळे छान उत्पन्न मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पिंपळदरी, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील  मी बाळू सुलताने, म्हणाले,‘‘ मी गेल्या तीन वर्षापासून मिरची पीक घेत आहे. धानुका कंपनीचे लानेवो हे औषध १३ दिवसांपूर्वी फवारले होते. त्यामुळे मिरची पीकात थ्रीपस, अळी, पांढरी माशी पिकात झालेली दिसत नाही. पाने सुध्दा टवटवीत दिसत आहेत. शेतक-यांनी नक्की वापरावे असेच हे कीटकनाशक आहे.’’

शेजारीच असलेल्या जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील वेळेगावचे संतोष गोरे सांगतात की गेल्या पाच वर्षापासून ते मिरची पिकाची लागवड करत आहे. यंदा त्यांनी एक एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. डेमो म्हणून लानेवो कंपनीचे औषध फवारले आहे. त्यामुळे पिकावर थ्रीपस, आळीचा प्रादुर्भाव झालेला नाही. आणि पिक चांगले वाढताना दिसते. याच भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील  सुनील बावस्क यांनीही मिरची पीक यंदा मोठया प्रमाणात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लानेवो हे औषध फवारले होते. त्यामुळे पिकात अळी, थ्रीपस, पांढरी माशी, जे की पूर्वी मोठया प्रमाणावर असायचे, आता औषध फवारणी केल्यावर दिसून येत नाही. तसेच पिकात रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला दिसत नाही. त्यामुळे पीक चांगले वाढताना दिसत असल्याचेही ते सांगतात.

श्रीकांत पाटील, रा. मोर्शी, ता. कराड, जि. सातारा यांचे सात एकर क्षेत्रात उस हे पिक असते. गेले ४ वर्ष झाली, ते टोमॅटोचे पीक घेत आहेत. सध्या वातावरण खराब असल्याने पिकात नागआळी, अशी बरीच कीड होती. धानुका कंपनीचे लानेवो औषध फवारल्याने पीकातील - कीड नाहीशी झाली आणि फळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पिक चांगले येईल असा त्यांना विश्वास वाटतोय.

लहू मधुकर वायखंडे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यात एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. त्यावर अळी, नागअळी, यांचा प्रादुर्भाव दिसत होता, त्याच्यानंतर त्यांनी धानुका कंपनीचं लानेवो हे प्रॉडक्ट वापरले आणि याचे  चांगल्या प्रकारे परिणाम जाणवले आहेत. यात झाडाची वाढ, झाडाचे फुटवे चांगले निघताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी हेच उत्पादन वापरावे असा सल्लाही ते आता देतात. 

नाशिक जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी असंख्य आहेत. सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील शेतकरी दीपक कोकाटे हे असेच एक टोमॅटो उत्पादक शेतकरी. त्यांनी एक एकरासाठी टोमॅटो पिकात लानेवोचा स्प्रे घेतला, त्याचा चांगला रिझल्ट दिसतो आहे. टूटा, नागअळी या किडींपासून पिकाचे संरक्षण झालेले आहे. अजूनही ८-१० दिवस कोणत्याही औषध फवारणीची गरज पडणार नाहीये असे त्यांनी सांगितले. 

तरुण शेतकरी महेश बाळासाहेब गांडुळे हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साईखिंडी गावी राहतात. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले,‘‘ माझ्याकडे पाच एकर शेती आहे दरवर्षी आम्ही यात ३० गुंठे ते एक एकर वांगी हे पीक करत असतो यावर्षी वांगे पीक करीत असताना वांग्यावरील शेंडेअळी व पांढरी माशी व इतर किडी याचा नियंत्रणासाठी वेगवेगळी औषधे मारली परंतु त्याचा पाहिजे इतका फरक जाणवला नाही. काही दिवसांपूर्वी धानुकांचे प्रतिनिधी आमच्या शेतावर आले होते. त्यांनी त्यांचा एक नवीन प्रॉडक्ट आला आहे, असे सागितले व त्याबद्दल आम्हाला माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्या औषधाचा रिझल्ट पाहिला. चार-पाच सऱ्यावर हे औषध मारले आणि या औषधाचा वांग्यावरील कीड नियंत्रणासाठी चांगला परिणाम झाला. आम्ही हे औषध ज्या ठिकाणी मारलं नाही, त्या ठिकाणी शेंडेअळी तशीच राहिली आहे व पानांची व फुलांची वाढ सुद्धा म्हणावी अशी झाली नाही.’’

अधिक माहितीसाठी संपर्क

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणभाज्याशेतकरीशेती क्षेत्रटोमॅटो