Join us

जाणून घेऊया कृषि पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सुविधा

By बिभिषण बागल | Published: July 19, 2023 12:51 PM

कृषि पर्यटन व्यवसाय मधील येणारे पर्यटक आपल्याला अतिथी देवो भव समान आहेत त्यांच्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा ह्या उत्तम असाव्यात ...

कृषि पर्यटन व्यवसाय मधील येणारे पर्यटक आपल्याला अतिथी देवो भव समान आहेत त्यांच्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा ह्या उत्तम असाव्यात कारण हेच पर्यटक आपल्या व्यवसायाचे विपणन करण्यास मदत करणार आहेत.

शेतीसोबत खालीलपैकी एक किंवा अनेक किंवा सर्व सेवा कृषी पर्यटन केंद्र चालकांनी पर्यटकांना उपलब्ध करुन द्याव्यात. अ) एक दिवसीय सहल (डे ट्रिप)आ) निवास व्यवस्था इ) मनोरंजनात्मक सेवा (उदा. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, साहसी खेळ. ग्रामीण खेळ, इ.)ई) कृषी कैंपिंग (तंबु निवारा)उ) फळबागा व पदार्थ विक्री केंद्र (Product Sale) (उदा. संत्री/संत्र्याचा ज्युस, द्राक्षे/वाईन, स्ट्रॉबेरी/स्ट्रॉबेरीपासून बनविलेले पदार्थ इ.)

१) निवास व्यवस्था:कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी पर्यटकांना निवास व्यवस्था उपलब्ध करुन देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राकरिता खालील तक्त्यातील बाबी लागू राहतील.

अ.क्र. 

शेतीचे क्षेत्र

खोल्यांची संख्या

खोल्यांचे आकारमान

०२ एकर पर्यंत

०४ (कमाल)

१५० चौ. मी. किमान

०२ एकर पेक्षा जास्त व ०५ एकर पर्यंत

०६ (कमाल)

१५० चौ. मी. किमान

०५ एकर व त्यापेक्षा जास्त

०८ खोल्या व शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था असलेले २ लोकनिवास (२५ गाद्या प्रत्येकी)

खोलीचे किमान आकारमान १५० चौ.मी. लोकनिवासाचे किमान आकारमान ७००-८०० चौ.फू.

  • प्रत्येक खोलीस जोडलेले शौचालय, बाथरुम आवश्यक राहील. सदर पर्यटक निवासस्थानाचे बांधकाम हे शक्यतो पर्यावरणपूरक असावे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे.
  • शालेय सहलींसाठी अथवा मोठया समूहासाठी २५ बेडची क्षमता असलेले जास्तीत जास्त दोन लोकनिवास (Dormitary) बांधता येतील. परंतू त्याकरीता किमान ५ एकर क्षेत्र असणे बंधनकारक राहील.
  • पर्यटन धोरण २०१६ प्रमाणे आठ खोल्यांपर्यंतच्या केंद्रांसाठी खोल्या आणि सुविधांच्या बांधकामासाठी नगर रचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. आठपेक्षा जास्त खोल्या असलेली केंद्रे व्यावसायिक उपक्रम म्हणून ओळखली जातील आणि त्यासाठी नगर रचना विभागाची परवानगी आवश्यक असेल.

२) भोजन व्यवस्था व स्वयंपाकघर (सर्व प्रकारच्या सेवांकरिता बंधनकारक) नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र चालकाने पर्यटकांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी किमान १५ x १० आकाराचे स्वयंपाकघर असावे.३) कृषी पर्यटन केंद्र चालविण्यासाठी पर्यटन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र घेणे तसेच आवश्यक त्या इतर सर्व विभागांच्या परवानग्या घेणे बंधनकारक राहील.तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी फर्स्ट एड बॉक्स (First Aid Box) पर्यटन केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात यावा..४) अग्नीशामक यंत्र बसविणे आवश्यक राहील.५) जागतीक साथरोगासंदर्भात (उदा. कोविड-१९) सुरक्षिततेच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक राहील.६) कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी सुस्थितीतील पोहोच रस्ता (approach road) तसेच पर्यटकांच्या वाहनासाठी वाहनतळाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

कृषी पर्यटनाअंतर्गत शेतीसोबत खालीलपैकी सर्व किंवा काही उपक्रम राबविता येतील

  • हरितगृह
  • दुग्धव्यवसाय
  • मत्स्य व्यवसाय (मत्स्यशेती, मत्स्यतळे)
  • रोपवाटिका (नर्सरी), फळबागा.
  • पशु-पक्षी पालन (कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढी पालन इ.)
  • निसर्ग साहसी पर्यटन याकरिता स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल. 
  • वाईन टुरिझम.
टॅग्स :शेतीपर्यटनशेळीपालनफुलं