Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > खडकाळ जमिनीत पिकवले सफरचंद; आता कृषी पर्यटनाकडे वाटचाल

खडकाळ जमिनीत पिकवले सफरचंद; आता कृषी पर्यटनाकडे वाटचाल

success story of dr sitaram jadhav from kannad who is apple farmer | खडकाळ जमिनीत पिकवले सफरचंद; आता कृषी पर्यटनाकडे वाटचाल

खडकाळ जमिनीत पिकवले सफरचंद; आता कृषी पर्यटनाकडे वाटचाल

सेंद्रीय शेतीतून कृषी पर्यटनाकडे वाटचाल करून पाहणाऱ्या एका सेवानिवृत्त डॉक्टर शेतकऱ्याची ही यशकथा

सेंद्रीय शेतीतून कृषी पर्यटनाकडे वाटचाल करून पाहणाऱ्या एका सेवानिवृत्त डॉक्टर शेतकऱ्याची ही यशकथा

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर

नोकरी सुरु असताना आर्थिक बचत म्हणून  घेतलेल्या डोंगराळ जमिनीचा कायापालट करत आज ३-३ एकर चे दोन सफरचंद चे प्लॉट, हळद, अद्रक, केळी, आंबा, शेततळे, नारळ, तलाव, औषधी वनस्पती, गौशाळा, चारा पिके, आदींची शेती करत कृषी पर्यटनाचा पाया रोवत आहे शासकीय सेवेतील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ सीताराम जाधव. 

आवड आणि काहीतरी शेतीत करायचं या इच्छेने काय होऊ शकतं याच उदाहरण म्हणजे डॉ जाधव. अगदी  खडकांच्या चढ उताराचे रूपांतर जाधव यांनी शेती उपयोगी जमिनीत केलेले आज बघावयास मिळतात. छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये धुळे-सोलापूर हायवेला जाधव यांचे हे प्रगत शेत विस्तारलेले आहे.

सफरचंदाची शेती 
मजुरांची कमतरता, पिकांवर होणारे विविध प्रादुर्भाव या सर्वांना त्रस्त होऊन कमी मेहनतीची फळबाग करण्याचे योजल्यावर त्याचा शोध घेताना आम्हाला सफरचंद शेती (apple farming) करण्याचा मार्ग दिसला. यात आपल्याकडे येणाऱ्या तीन जाती आहे. ज्यात अण्णा, गोल्डन, एच आर ९९ यांपैकी एच आर ९९ प्रजातीच्या सफरचंदाची पहिली लागवड आम्ही २०२० साली ३ एकर क्षेत्रावर केली, ज्यात हिमाचल प्रदेश येथून आणलेल्या एकूण ७०० झाडांची लागवड झालेली आहे. कुठलेही रासायनिक किटकनाशक न वापरता सेंद्रिय पद्धतीने या बागेचे संगोपन केले असून चालू वर्षी विक्री हेतू फळ घेण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या झाडाला साधारण प्रति झाड १०-१५ किलो उत्पन्न मिळेल. सरासरी बाजार भाव ५० रुपये किलो गृहीत धरला तरी तीन लाख पन्नास हजार उत्पन्न होईल. हेच उत्पन्न पुढे ५ वर्षांची बाग झाल्यावर प्रति झाड ५० किलो फळे मिळेल. सध्या झाडांची पानगळ होण्यासाठी पाणी बंद केले असून फेब्रुवारी मध्ये फुलधारणा सुरु करून मार्च ते मे फळ तयार होतील व जून मध्ये काढणी करणार असल्याचे डॉ जाधव यांनी सांगितले. 

सेंद्रिय शेती आणि गोशाळा
डॉ जाधव यांच्याकडे लहान मोठया एकूण ९०-१०० गीर गाई आहेत. ज्यातून त्या गाईंच्या वासऱ्यांना प्रथम दूध दिले जाते. उर्वरित दुधाला प्रक्रिया करून दही ताक बनवून ते शेतीसाठी उपयोगात आणतात. या गाईंपासून मोठ्या प्रमाणात शेण खत उपलब्ध होते ज्याला चांगल्या प्रकारे कुजवत त्यात अन्नद्रव्य मिसळून शेतात पसरविले जाते. ज्यामुळे उत्पन्न वाढ होत असून जनिमीचा पोत सुधारत असल्याचे डॉ जाधव सांगतात. 
 
जल व्यवस्थापन 
पाणी पाहणी करून देखील १०० फुटांवर पाणी आढळलं नसल्याने तीन एकर क्षेत्रात खोदकाम करत शेततळे किंबहुना तलाव केला असून यात पाणी साठवले जाते. ज्याला जवळील धरणासोबत जोडले आहे. 

कृषी पर्यटन 
मागील वर्षभरापासून या शेतात देश विदेशातील विविध मसाले, औषधी, आणि फळांचे झाडे लावण्यात आलेले आहे. पुढील काही वर्षांत ही झाडे मोठी झाल्यावर सर्वांची माहिती ओळख करून देत वनभोजन, तलावाच्या ठिकाणी नौकाविहार, गोशाळा भेट, असे कृषी पर्यटन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. 

Web Title: success story of dr sitaram jadhav from kannad who is apple farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.