Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात

Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात

Animal Care Don't let cattle get wet in the rain; Illness will bring financial loss | Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात

Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात

काळजी पशुधनाची बचत शेतकरी बांधवांची

काळजी पशुधनाची बचत शेतकरी बांधवांची

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र जाधव (शिऊरकर)

अनेक शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, शेळी, मेंढी, कोंबडी पालन करतात. मात्र हे पशुधन सांभाळत असताना एक दोनच मोठे पशुधन असेल तर त्याकरिता बर्‍याचदा वेगळी व्यवस्था अर्थात त्यांचे घर असलेला गोठा/शेड शेतकरी करत नाही. झाडाच्या खाली, घराच्या आडोश्याला त्यांना बांधलं जात व तिथेच त्यांना चारा पाणी दिले जाते.

अलिकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा जोर देखील वाढताना दिसून येत आहे. तसेच कधी क्षणात नदीनाळे भरणारा पाऊस तर कधी सौम्य गतीचा एक दोन दिवस चालणारा सलग पाऊस. अशावेळी ही जनावरे बर्‍याचदा पावसात भिजताना आढळून येतात. ज्यातून काही अंशी वीज पडून ही जनावरे दगावतात. तर अनेक जनावरे पावसात भिजल्याने विविध आजरांच्या आहारी जातात. ज्यामुळे शेतकरी आर्थिक हानीस बळी पडतो. 

animalcare

पावसाळ्यात असणारे दमट वातावरण गोचीड, पिसा, लिखा यांना पोषक मानले जाते. पाण्यात भिजलेल्या जनावरांची त्वचा या दमट वातावरणामुळे लवकर कोरडी होत नसल्याने अशा वेळी त्यांना गोचीड तसेच इतर परजीविंचा प्रादुर्भाव लवकर होतो. परिणामी गोचीड ताप सारखे खर्चीक आजार जनावरे पावसात भिजल्याने होऊ शकतात. 

शेळ्या मेंढया मध्ये देखील गोचीडांचा प्रादुर्भाव होतो. तसेच काही आजारांना देखील त्या बळी पडतात. तर कोंबडी यात मृत होऊ शकते. यामुळे पावसाळयापूर्वी आपल्याकडील पशुधनाला पावसापासून सुरक्षित ठेवेल असा निवारा नक्की उभरायला हवा. जेणेकरून आर्थिक हानी होणार नाही.  

हेही वाचा - जनावरांच्यातील विषबाधा टाळायची असेल तर हे करू नका

Web Title: Animal Care Don't let cattle get wet in the rain; Illness will bring financial loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.