Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Animal Care In Winter : हिवाळ्यात पशुधनाला होऊ शकते आजारांची बाधा 'अशी' घ्या काळजी

Animal Care In Winter : हिवाळ्यात पशुधनाला होऊ शकते आजारांची बाधा 'अशी' घ्या काळजी

Animal Care In Winter : Take care of diseases that can affect livestock in winter | Animal Care In Winter : हिवाळ्यात पशुधनाला होऊ शकते आजारांची बाधा 'अशी' घ्या काळजी

Animal Care In Winter : हिवाळ्यात पशुधनाला होऊ शकते आजारांची बाधा 'अशी' घ्या काळजी

Animal Care In Winter : हिवाळ्यात जनावरांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात जनावरांची काळजी घेण्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स. 

Animal Care In Winter : हिवाळ्यात जनावरांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात जनावरांची काळजी घेण्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स. 

शेअर :

Join us
Join usNext

हिवाळा हा ऋतु जरी सुंदर असला तरी आपल्या जनावरांसाठी हा ऋतु काहीसा आव्हानात्मक असतो. थंडी, पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे, हिवाळ्यात जनावरांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात जनावरांची काळजी घेण्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स. 

गोठा ठेवा उबदार; जनावरे असतील दमदार 
१) हिवाळ्यात अधिक थंडी जाणवू नये यासाठी गोठ्याची रचना अशी असावी की त्यात पुरेसा उन्हाचा प्रकाश येऊ शकेल.
२) गोठ्यात पुरेसे वस्तू असाव्यात जेणेकरून जनावरे एकमेकांना उबदार ठेवू शकतील.
३) गरज असेल तर गोठ्यात अतिरिक्त उष्णता देण्याची व्यवस्था करावी.
४) खिडक्या आणि दरवाजे योग्य प्रकारे बंद असावेत जेणेकरून थंड हवा गोठ्यात प्रवेश करू नये.

असे करा पोषण, आजार नाही करा शोषण 
१) हिवाळ्यात जनावरांना अतिरिक्त ऊर्जा लागते. त्यामुळे त्यांना पोषक तत्वांनी भरपूर असणारा चारा द्यावा.
२) संरक्षित खाद्य पदार्थ, जसे की धान्य, गवत इ. जनावरांना द्यावे.
३) पाणी नेहमीच स्वच्छ आणि उबदार असावे.
४) खनिज आणि जीवनसत्त्वे यांची पुरवठा करावा.

गोठ्याची स्वच्छता गरजेची 
१) गोठ्याची स्वच्छता नेहमी राखावी.
२) जनावरांना नियमितपणे स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी.
३) जनावरांच्या शरीरावर कोणतेही जखम किंवा भेगा असल्यास त्यावर योग्य उपचार करावा.

आरोग्य तपासणीला नको दिरंगाई 
१) जनावरांना नियमितपणे पशुवैद्यकाकडे दाखवावे.
२) कोणत्याही आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
३) खोकला, ताप, नाकाला पाणी येणे इ. लक्षणांकडे लक्ष देऊन तात्काळ उपचार करावा.

'अशी' घ्या गुरांच्या पायांची काळजी
१) हिवाळ्यात जनावरांचे पाय जास्तीत जास्त ओले राहतात, त्यामुळे पाय फुटण्याची शक्यता असते.
२) पाय साफ ठेवावेत आणि कोणतीही भेगा असल्यास त्यावर उपचार करावा.

दुधाळ जनावरांची काळजी
१) हिवाळ्यात दुधाळ जनावरांना अतिरिक्त पोषण देणे आवश्यक आहे.
२) दुध काढणी नंतर उबदार पाण्याने थन/सड साफ करावे.
३) थनांवर कोणतीही भेगा असल्यास त्यावर योग्य उपचार करावा.

वरील माहितीप्रमाणे पशुपालकांनी आपल्याकडील पशूधनाची हिवाळ्यात विशेष काळजी घेणे म्हणजे त्यांचे दीर्घायुष्य आणि उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य आहे.

डॉ. एफ. आर. तडवीडॉ. आर. एल. कदम
कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर जि. जालना.

हेही वाचा : Sericulture Success Story : रेशीम शेतीने दिले नवे जीवन; मराठवाड्याचा शेतकरी म्हणतोय रेशीम दैवी वरदान

Web Title: Animal Care In Winter : Take care of diseases that can affect livestock in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.