Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > पशुखाद्य महागले, दुधाचे ३५ रुपयांवरून २५ वर; शेतकरी दुहेरी संकटात

पशुखाद्य महागले, दुधाचे ३५ रुपयांवरून २५ वर; शेतकरी दुहेरी संकटात

Animal feed costlier, milk from Rs 35 to Rs 25; Farmers in double trouble | पशुखाद्य महागले, दुधाचे ३५ रुपयांवरून २५ वर; शेतकरी दुहेरी संकटात

पशुखाद्य महागले, दुधाचे ३५ रुपयांवरून २५ वर; शेतकरी दुहेरी संकटात

पशुधनाचे भाव किती?

पशुधनाचे भाव किती?

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही दिवसांपूर्वी दुधाचे दर ३५ रुपये होते. मात्र, शासनाने दर ३५ रुपयांवरून २५ रुपयांवर आणल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पेंड व चाऱ्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे आहे. शासनाने दर वाढवून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर दरवर्षीच संकटाची मालिका सुरू असते. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ असतो. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला गेल्या काही दिवसांपूर्वी ३५ रुपये लिटर भाव दिला जात होता. मात्र, अशात दुधाचा दर घसरल्याने शासकीय डेअरीत दुधाला ३.५ फॅट, ८.५ एसएनएलला २५ रुपये भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

दुध उत्पादनवाढीसाठी बायपास प्रोटीनयुक्त आहार

पशुखाद्याचे दर

पेंड -३२०० रुपये क्विंटल

ऊस -३००० हजार रुपये टन

वाढे -६०० रुपये शेकडा

चाराअभावी कसायाच्या दावणीला जनावरे बांधण्याची आली वेळ

सरकारने गेल्या काही दिवसांपासून दुधाचा दर २५ रुपयांवर आणल्यामुळे शेतीबरोबर जोडधंदाही आर्थिक संकटात सापडला आहे. -भारत सोनवणे, शेतकरी


शेतकऱ्यांसमोर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यात आता दुधाचा दर कमी केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. -सुनील देशमुख, शेतकरी

जनावरांना लागणारा चारा, पेंड, उसाच्या वाढ्यांचे दर वाढल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दरम्यान, दूध उत्पादक शेतकरी शासनाने दूधाला दरवाढ द्यावी, अशी मागणी करीत आहेत. त्यात जनावरांच्या पोषण आहार (खुराक) यांच्या किंमतीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे.

Web Title: Animal feed costlier, milk from Rs 35 to Rs 25; Farmers in double trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.