Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बैलचलित आंतरमशागतीची अवजारे ठरता आहेत फायदेशीर

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बैलचलित आंतरमशागतीची अवजारे ठरता आहेत फायदेशीर

Bullock-driven intercropping implements are beneficial for smallholder farmers | अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बैलचलित आंतरमशागतीची अवजारे ठरता आहेत फायदेशीर

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बैलचलित आंतरमशागतीची अवजारे ठरता आहेत फायदेशीर

अल्‍प, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकऱ्यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प पशुशक्‍तीचा योग्‍य वापर यांच्यामार्फत उत्तम कार्य केले जाते आहे.

अल्‍प, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकऱ्यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प पशुशक्‍तीचा योग्‍य वापर यांच्यामार्फत उत्तम कार्य केले जाते आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकामाकरिता शेत मजुरांची कमतरता, वाढती मजुरी यामुळे कृषि यांत्रिकीकरणाची गरज असुन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मनुष्‍य चलित, बैल चलित व ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर होताना दिसतो आहे. अल्‍प, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकऱ्यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प पशुशक्‍तीचा योग्‍य वापर यांच्यामार्फत उत्तम कार्य केले जाते आहे. त्यांच्यामार्फत विकसित अवजारे यांची माहिती पाहूया.

एक बैलचलित टोकण यंत्र
वनामकृवि एक बैलचलित टोकन यंत्राची प्रसारण करण्यासाठी शिफारसीस मान्यता देण्यात आली. या टोकण यंत्राची क्षमता प्रती तास ०.१८९ हेक्टर एवढी असुन लहान व अल्पभुधारक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे. हे यंत्र पिकामधील पेरणीसाठी/रिलेक्रॉपींगसाठी उपयुक्त आहे.

बैलचलित सरीयंत्रासहित तीन पासेचे कोळपे
वनामकृवि बैलचलित तीन पासेचे कोळपे सरीसह रुंद वरंबा व सरीवरील पिकातील आंतरमशागत करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे कोळपे बीबीएफने पेरणी केलेल्या जमिनीत कोळपणी व सरी तयार करण्यासाठी उपयुक्त असुन याची क्षेत्रीय क्षमता प्रती तास ०.२० हेक्टर आहे तर गवत काढण्याची क्षमता ८४ टक्के आहे. यामुळे मजुरीवरील खर्चात ६०-७० टक्के बचत होते.

बैलचलित सौर ऊर्जावर चालणारे तणनाशक फवारणी यंत्र
वनामकृवि बैलचलीत सौर फवारणी यंत्रांची तणनाशके फवारणी करण्याकरीता प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे सौर ऊर्जावर चालत असल्याने प्रदुषणरहित फवारणी यंत्र असुन एकूण १२ नोझल्स असून एकत्रित बुम प्रवाह ७.० ते ९ लि/मि एवढा आहे. फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, पैशाची बचत होते. या यंत्रीची क्षमता प्रती तास १.१३ हेक्टर तर ओढण शक्ती ३४.१४ किलो एवढी आहे.
 

Web Title: Bullock-driven intercropping implements are beneficial for smallholder farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.