Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > पशुपालकांनो वेळीच घ्या खबरदारी; लम्पीने होईल मोठी हानी

पशुपालकांनो वेळीच घ्या खबरदारी; लम्पीने होईल मोठी हानी

cattle farmer take precautions in time; Lumpy will cause great damage | पशुपालकांनो वेळीच घ्या खबरदारी; लम्पीने होईल मोठी हानी

पशुपालकांनो वेळीच घ्या खबरदारी; लम्पीने होईल मोठी हानी

कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा हा आजर मात्र जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.

कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा हा आजर मात्र जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा हा आजर मात्र जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.

‘लम्पी स्कीन’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी घेत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल.


लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे 

या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते. दुभती गाय, म्हैस असेल तर दुध देन बंद करते. 
लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो. जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात.हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. 

पायावर तसेच कानामागे सूज येते.जनावरे दूध देण्यास कमी पडतात. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो.चावणाऱ्या माश्या ,डास व गोचीड , दूध पिणाऱ्या वासरांना बाधित गायीच्या दुधातून व सडावरील  व्रनातून रोगाचा प्रसार होतो. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. 

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?

लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लम्पीचे परिसरात लक्षणे दिसून येत असल्यास एकमेकांमधील जनावरांची खरेदी – विक्री टाळावी.

Goat Farming : शेळी पालनाचे प्रकार व त्यांची माहिती 
 

जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. गोठा हवेशीर व कोरडा ठेवावा. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.

बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी ८ ते ९ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. जनावरांमधून माणसांमध्ये हा आजार पसरत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी या जनावरांचे दूध वापरात आणू नये असाही सल्ला दिला जातो. लम्पी आजारात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी दुध उत्पादनावर परिणाम होत असल्याने पशुपालकांनी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

संसर्ग झालेल्या जनावराच्या दुधात विषाणू आढळून आल्याची कोणतीही माहिती अद्याप झालेली नाही. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून दूध उकळूनच प्यावे. मानवामध्ये लम्पीसारखा कोणताही विषाणू नाही. मानवांमध्ये त्याचा प्रसार झाल्याची अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

डॉ. श्रीकांत मोहन खूपसे
सहाय्यक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली छत्रपती संभाजीनगर मो.नं. ८६०५५३३३१५

डॉ. एन एम मस्के
प्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली छत्रपती संभाजीनगर

Web Title: cattle farmer take precautions in time; Lumpy will cause great damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.