21st livestock census : जनगणनेमध्ये दहा वर्षांनी लोकसंख्या वाढत आहे. मात्र पशुगणनेत (livestock census) उलट स्थिती समोर आली असून, दहा वर्षाच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यातील पशुंची संख्या घटत आहे.
२१ व्या पशुगणनेची आकडेवारी नुकतीच समोर आली. त्यात शेळ्या मेंढ्या, गायी- म्हशींची संख्या ७८ हजारांनी घटली. तर कुक्कुट पक्ष्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. (livestock)
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने केले होते. (livestock)
अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले होते. पशुगणनेसाठी ग्रामीण भागासाठी ७४ आणि शहरी भागासाठी ९ असे एकूण ८३ प्रगणक, तर ग्रामीण भागाकरिता २२ आणि शहरी भागासाठी ५ असे एकूण २७ पर्यवेक्षक नेमले होते. (livestock census)
गाव, तांडे, वाडी, नगरात भेटी देऊन पशुपालकांशी संवाद साधत पशुधनाची नोंद घेतली जात होती. जिल्ह्यातील पशुगणना (livestock census) नुकतीच संपली आहे.
२० व्या पशुगणनेच्या (livestock census) तुलनेत शेळी-मेंढ्या, गायी-म्हशी, वराह यांची संख्या ७८ हजार १५५ एवढी घट झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे. तर, कुक्कुटपक्ष्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, पशुधनात घट झाल्याचे समोर आल्याने पशुधन वाढविण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागू शकतात.
हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा क्रमांक
जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एस. बी. खुणे यांच्या पथकाने पशुगणना करण्यास सुरुवात केली होती.
३१ मार्चपर्यंत पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. राज्यात केवळ तीन जिल्ह्यांनीच आतापर्यंत पशुगणना पूर्ण केली आहे. यात हिंगोली जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे पशुगणनेच्या कामाबाबत जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.
कुक्कुटपक्ष्यांची संख्या वाढली
जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार १ लाख ६५ हजार १८१ एवढे कुक्कुट पक्षी होते. २१ व्या पशुगणनेत ही संख्या २ लाख ३२ हजार ४८५ वर पोहचली आहे. तब्बल ४० टक्क्यांनी ही संख्या वाढली आहे.
७८४ वाडी, तांडे, गावे प्रगणकांनी काढले पिंजून
पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभागाच्या प्रगणक, पर्यवेक्षकांनी जिल्ह्यातील ७८४ वाडी, तांडे, गाव पिंजून काढले आहेत. गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदी पाळीव प्रजातीच्या जाती, लिंग व वय निहाय गणना केली जात होती. पशुधनाची नोंदणी करून ही माहिती अॅपमध्ये भरण्यात येत होती.
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या
२० वी पशुगणना | ४८०००० |
२१ वी पशुगणना | ४०१०३४ |
शेळ्या-मेंढ्या, गाई-म्हशी, वराह संख्या | १६५१८१ |
कुक्कुट पक्षी | २३२४८५ |
७८ हजारांनी घटले पशुधन
जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार शेळ्या-मेंढ्या, गाय-म्हैसवर्गीय पशुधन, वराह यांची संख्या ४ लाख ८० हजार एवढी होती. २१ व्या पशुगणनेत ही संख्या ४ लाख १ हजार ३४ वर आली आहे. जवळपास ७८ हजार १५५ एवढे पशुधन कमी झाल्याचे चित्र आहे.