Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > 21st National Livestock Census : बुलढाणा जिल्ह्यात पशुगणनेची काय आहे स्थिती जाणून घ्या सविस्तर

21st National Livestock Census : बुलढाणा जिल्ह्यात पशुगणनेची काय आहे स्थिती जाणून घ्या सविस्तर

21st National Livestock Census: Know the status of livestock census in Buldhana district in detail | 21st National Livestock Census : बुलढाणा जिल्ह्यात पशुगणनेची काय आहे स्थिती जाणून घ्या सविस्तर

21st National Livestock Census : बुलढाणा जिल्ह्यात पशुगणनेची काय आहे स्थिती जाणून घ्या सविस्तर

21st National Livestock Census : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना (Livestock Census) करण्यात येते. जिल्ह्यात पशुगणनेस २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात झाली असून, २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील किती गावांमध्ये गणना पूर्ण झाली आहे. जाणून घेऊ सविस्तर माहिती.

21st National Livestock Census : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना (Livestock Census) करण्यात येते. जिल्ह्यात पशुगणनेस २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात झाली असून, २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील किती गावांमध्ये गणना पूर्ण झाली आहे. जाणून घेऊ सविस्तर माहिती.

शेअर :

Join us
Join usNext

बुलढाणा : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना (Livestock Census) करण्यात येते. जिल्ह्यात पशुगणनेस २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात झाली असून, २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ३६६ गावांमध्ये गणना पूर्ण झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ९७१ गावांमध्ये गणनेचे काम प्रगतिपथावर आहे. शहरी भागातील २६८ पैकी २१ वार्डात पशुगणना पूर्ण झाली आहे.

जनावरांमधील साथीचे रोग, रोगांवरील नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि प्रकल्प, दुधाचे उत्पादन (Milk production), दुधाच्या कमी जास्त होणाऱ्या किमती, राज्यातील एकूण पशुधन आणि त्याचे व्यवस्थापन यासर्व गोष्टींसाठी पशुगणना महत्त्वाची असते.

धोरण निश्चितीसाठी पशुधनाची योग्य माहिती जवळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी देशभरातील पशुधनाची गणना (National Livestock Census) करण्यात येते.

१७३ प्रगणकांची नियुक्ती!

जिल्ह्यातील १ हजार ३३७ गावांमध्ये पशुंची गणना करण्यासाठी १७३ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक बुलढाणा तालुक्यात २३, तर खामगाव तालुक्यात २१ प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. चिखली तालुक्यात २०, मेहकरमध्ये १७, मोताळा आणि नांदुरामध्ये प्रत्येकी १२, सिंदखेड राजा, जळगाव जामोद प्रत्येकी १० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणार आणि संग्रामपूर तालुक्यात प्रत्येकी २ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१६ प्रजातींच्या पशुधनाची गणना

या पशुगणनेत जिल्ह्यात १६ प्रजातीच्या पशुधनाची गणना करण्यात येत आहे. गणनेसाठी जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना आणि प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

नागरी भागासाठी प्रती चार हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि १० प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. तसेच, ग्रामीण भागासाठी तीन हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि पाच प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे.

तालुकानिहाय पूर्ण झालेली पशुगणना

तालुकागाव आणि वार्ड
बुलढाणा२३
चिखली३५
देऊळगाव राजा१७
जळगाव जामोद३३
खामगाव३१
लोणार२१
मलकापूर३३
मेहकर४६
मोताळा४६
नांदुरा२०
संग्रामपूर२४
शेगाव१८
सिंदखेड राजा४०

हे ही वाचा सविस्तर : Animal Fodder : चाऱ्यासाठी पशुपालकांची वणवण थांबणार तरी कधी? वाचा सविस्तर

Web Title: 21st National Livestock Census: Know the status of livestock census in Buldhana district in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.