जत तालुका दुष्काळात होरपळत असताना राजकीय मंडळी राजकारणात गुंग आहेत तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवित आहे. १९७२ पेक्षा भीषण अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तरीसुद्धा चारा-पाणी मिळेनासा झाला आहे. त्यामुळे मेंढपाळ चाऱ्यासाठी भीमानदी काठी स्थलांतर करू लागले आहेत. तालुक्यात शेती व्यवसायाबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या-मेंढ्यांचे पालन केले जाते. माडग्याळ येथील आठवडा बाजार शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. भूमिहीन, शेतमजूर, ऊसतोडणी मजूर शेळी पाळतो. तालुक्यात शेळ्यांची संख्या ४५ हजार ९६४ इतकी आहे. मेंढ्यांची संख्या १ लाख ६२ हजार ८७७ इतकी आहे.
यावर्षी मान्सून व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे भीषण मजूर शेळी पाळतो. तालुक्यात शेळ्यांची संख्या ४५ हजार ९६४ इतकी आहे. मेंढ्यांची संख्या १ लाख ६२ हजार ८७७ इतकी आहे. यावर्षी मान्सून व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अधिक वाचा: दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी
पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. रानात खुरट्या गवताची उगवण झाली नाही. काटेरी वनस्पतीला पालवी फुटलेली नाही. चाऱ्यायासाठी रानोमाळ वणवण भटकंती करावी लागत आहे.
मेंढपाळाने अक्कलकोट, उदगीर, कर्नाटकातील गुलबर्गा, थांबा मसळी, नीरावरी या भागात घोडे, कुंटुंबासह स्थलांतर करू लागले आहेत. ५० टक्क्यांहून अधिक मेंढपाळाने चार पाच महिनेसाठी स्थलांतर केले आहे. मान्सून पाऊस पडल्यानंतर रानात गवताची उगवण झाल्यावर आषाढ महिन्यात गावाकडे परत येतात.
वांझपणाचे संकटशेळ्या-मेंढ्यां वांझचे प्रमाण वाढले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे गर्भधारणा होत नाही. त्यामुळे शेळ्या- मेंढ्या वांझ होत आहेत.
रानात मेंढ्यांना चारा व पाणी नाही. जनावरे जगवायची कशी, हा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही थांबा, मसळी, नीरावरी या भागात सहा महिन्यासाठी स्थलांतर करणार आहे. - म्हाळाप्पा मोटे, मोटेवाडी