Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > तुमच्या दारी ही येईल पशुधनाचा पशुवैद्यकीय दवाखाना; असा करा संपर्क

तुमच्या दारी ही येईल पशुधनाचा पशुवैद्यकीय दवाखाना; असा करा संपर्क

A livestock veterinary clinic at your doorstep; Do this contact | तुमच्या दारी ही येईल पशुधनाचा पशुवैद्यकीय दवाखाना; असा करा संपर्क

तुमच्या दारी ही येईल पशुधनाचा पशुवैद्यकीय दवाखाना; असा करा संपर्क

कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया, लसीकरण या बाबीसाठी पशुपालकांना मिळणार घरपोहच सेवा

कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया, लसीकरण या बाबीसाठी पशुपालकांना मिळणार घरपोहच सेवा

शेअर :

Join us
Join usNext

पशुधनाला वेळेवर उपचार न मिळाल्यास अनेकदा पशुपालकांना यांचा मोठा फटका बसतो. ज्यातून आर्थिक हानी तर होतेच सोबत पशुपालकचे नुकसान देखील होते. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याची संकल्पना पुढे आली. 

ज्यातून 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील विविध भागांना पशुवैद्यकीय दवाखाना बहाल केले आहे. राज्यातील पशुधन संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या दृष्टीने वेळेत व योग्य उपचाराकरिता ही मोबाईल व्हॅन सुविधा देणार आहे.

पशुधनाच्या उपचारासाठी पशुपालकांना शहर गाठावे लागते. अनेकवेळा पशुधनाची हेळसांड होत आहे. उपचार, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया लसीकरण या बाबीसाठी पशुपालकांना खासगी दवाखान्यावरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. या सर्व सुविधा आता ही व्हॅन पुरविणार आहे. ज्यामुळे पशुपालकांना याचा फायदा होईल सोबत वेळ वाचेल आणि हानी होणार नाही.

 ज्या भागात पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आहे, २५ किलोमीटरपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाना नाही, अशा दुर्गम भागासाठी फिरत्या दवाखान्याची आवश्यकता निश्चित करण्यात आली आहे. फिरत्या दवाखान्यामुळे गायी, म्हशी, शेळ्यांना वेळेत उपचार उपलब्ध होईल. दरम्यान, फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या नंबरवर संपर्क साधल्यानंतर पथक थेट गावात पोहोचणार आहे.

पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप 

फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुपालकांना व शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्येच अत्याधुनिक असलेल्या मोबाईल व्हॅनमधून सेवा पुरविण्यात येणार आहे. - डॉ. दिलीप मोरे, पशुवैद्यकीय अधिकारी, गेवराई जि. बीड 

 

Web Title: A livestock veterinary clinic at your doorstep; Do this contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.