नाशिक : एकीकडे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागातून शहरात दूध पुरवठा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात दुभत्या जनावरांची संख्या कमी झाल्याने तरीदेखील जवळपास वीस लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक शहराला दूध पुरवलं जातं. परंतु सद्यस्थितीत दुधात युरियासह घातक ऑक्सोटोसीन नावाचे औषध मिसळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आज दुधाचा वापर केला जातो. त्याचबरोबर हॉटेल व्यवसायात देखील दूध मोठ्या प्रमाणात वापरले जाते. नाशिक शहरातील वीस लाख लोकसंख्येच्या नागरिकांना दूध पुरवले जाते. मात्र दुधाचा पुरवठा कमी असताना दूध पुरवलेच कसे जाते, असा सवाल उपस्थित होत आहे. दुधाच पाणी तर टाकतातच; पण जनावरांचे दूध वाढण्यासाठी त्यांना बंदी असलेले ऑक्सोटोसीन नावाचे घातक इंजेक्शन दिले जाते. मग दूध प्रोटीनयुक्त की विषयुक्त, अशी चर्चा झाल्याशिवाय आता राहत नाही. म्हशीचे दूध 70 ते 80 रुपये लिटर या दराने विक्री होते. दुधाच्या दरानुसार त्याचा दर्जाही ठरतो. मात्र, लिटरमागे 70 रुपये मोजूनदेखील विनाभेसळयुक्त दूध मिळणे दुरापास्त झाले आहे.
नाशिकला दररोज तीन ते साडेतील लाख लिटर दुधाची आवश्यकता भासते. ग्रामीण भागातून आणि पॉकीटबंद माध्यमातून दुधाची विक्री होते. मात्र शहराची लोकसंख्या 20 लाख आहे. त्यामुळे रोजच दुधाची कमतरता भासत असते. एकीकडे दुधाच्या फॅटवरून त्याचा दर्जा ठरतो. तसेच मागील काही वर्षामध्ये डेअरी व्यवसाय वाढीस लागला आहे. काही खासगी डेअरी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या दुधापैकी काही दूध डेअरीला दिले जाते. दूध डेअरीमध्ये दुधाची तपासणी होते. त्यावरून दुधाचा भाव ठरतो. मागील सहा महिन्यांत भेसळप्रकरणी नगण्य कारवाया झाल्या आहेत, तर ऑक्सोटोसिन नावाचे घातक इंजेक्शन जनावरांना दिल्याप्रकरणी फक्त एक गुन्हा वर्षभरात नाशिक पोलिसांत दाखल आहे.
भेसळयुक्त दूध कसे ओळखाल?
अनेकवेळा दूध कमी पडल्यानंतर म्हशीच्या दुधात गायीचे दूध मिसळून दुधाची विक्री करण्यात येते. त्यामुळे दूध भेसळ हा त्रासदायक मुद्दा ठरला आहे. पाकीटबंद दुधाची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात होते. हॉटेल्समध्ये पाकीटबंद दुधाला मागणी असते. एक लाख लिटर पाकीटबंद दूध येते. दुधाचे 2-3 थेंब लिटमस पेपरवर टाकावेत. जर दुधामध्ये युरियाचा समावेश असेल, तर लिटमस पेपरचा लाल रंग बदलून निळा होईल. रंगामध्ये बदल आला नाही, तर दुधात भेसळ केलेली नाही असे म्हटले जाते. पातळ वाटल्यास त्यात पाणी टाकल्याचे समजते.