Join us

कमी प्रतीच्या दुधाला दिले अॅडव्हान्स मात्र दूध उत्पादकांची २ कोटींची देणे बाकी; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:56 IST

एकीकडे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची दोन कोटींवर रक्कम अडकली असताना माढ्याच्या वरवडेच्या दूध संस्थेला एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन कमी प्रतीचे दूध खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अरुण बारसकरसोलापूर : एकीकडे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची दोन कोटींवर रक्कम अडकली असताना माढ्याच्या वरवडेच्या दूध संस्थेला एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन कमी प्रतीचे दूध खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याशिवाय याच गुणप्रत वाढविलेल्या दुधाचे बिल काढण्याची घाई केली जात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणावरून दूध संघ संचालक मंडळाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा या संचालक मंडळाच्या कालावधीत होईल अशी दूध संस्थांची अपेक्षा होती.

खासगी दूध संघाकडून होणारा आर्थिक त्रास होऊ नये यासाठीच दूध संस्थांनी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत हे संचालक मंडळ निवडून दिले होते. मात्र, उलटेच झाल्याचे चित्र आहे.

दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांची दोन कोटींवर रक्कम संघाकडे अडकली आहे. ही रक्कम मिळावी यासाठी दूध पुरवठा केलेले शेतकरी व संस्था प्रमुख केगाव शीतकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत.

त्यांना देण्यासाठी संघाकडे पैसे नाहीत. याशिवाय सोलापूर शहराच्या जवळपास गुणवत्तेचे दूध पुरवठा करणाऱ्या अनेक दूध संस्था आहेत.

असे असताना माढा तालुक्यातील वरवडे गावचे दूध संबंधितांना एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन शिवाय दूध संघाच्या वाहनातून मध्यरात्री आणले आहे. लाख रुपये अनामत दिलेले व दूध संघाच्या गाडीतून आणलेले दूधही कमी प्रतीचे असल्याचे तपासणीत उघड झाले आहे.

कमी प्रतीच्या दुधाची गुणप्रत वाढविल्याचे कागदपत्र पुराव्यासह चंद्रभागा दूध डेअरीने दिल्यानंतरही कारवाई तर सोडा, त्याचे बिल काढण्यासाठी तगादा लावला जात आहे. दूध संघाच्या केमिस्टच्या कागदावर चेअरमन, संचालक व व्यवस्थापकीय संचालकांचा विश्वास नसल्याचे यावरून दिसत आहे.

तीन वर्षात दूध संकलन फक्त २३०० लिटरवरमार्च २२ मध्ये प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत साधारण ३१ हजार लिटर दूध संकलन २१ हजार लिटर दुग्धजन्य व पॅकिंग पिशवीसाठी दूध जात होते. संचालक मंडळाच्या तीन वर्षांच्या कालावधीत दुध संकलन २३०० लिटरवर आले आहे.

३१ हजार लीटर दुधाचे संकलन आले २१ हजारांवरदूध संस्थांनी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत हे संचालक मंडळ निवडून दिले होते. मात्र, उलटेच झाल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा: प्रत्येक गोठ्यात पशुप्रथमोपचार पेटी का असावी? व त्यात काय असावे? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायसोलापूरदूधदूध पुरवठाव्यवसायशेतकरीगाय