Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा?

AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा?

AI in Dairy : Just like agriculture, AI technology will now be introduced in the dairy industry; how will it benefit? | AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा?

AI in Dairy : शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायातही येणार आता 'एआय' तंत्रज्ञान; कसा होईल फायदा?

AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला.

AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला.

शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायात 'एआय' तंत्रज्ञान 'ब्लॉकचेन'च्या माध्यमातून राबवून दुधातील भेसळ कशा पद्धतीने रोखता येईल, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

जगात भारत हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे; पण जगाच्या बाजारपेठेतील दूध निर्यातीचे कडक होणारे धोरण पाहिले तर आपल्या दूध उत्पादकांना बदलण्याची गरज आहे.

जनावरांचे आधार कार्ड तयार झाले, तर एका क्लिकवर सर्व माहिती मिळू शकते. यासाठी, सरकारने 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची जबाबदारीही 'आदानी' कंपनीला दिली आहे.

'एआय' दुग्धव्यवसायात आणले तर भेसळीला चाप बसेल. पटणा (बिहार) येथील कार्यशाळेत इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य डॉ. चेतन नरके यांनी याबाबतची ब्लू प्रिंट सादर केली.

केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री राजीव रजन सिंह यांनी ब्लू प्रिंटचे कौतुक करत अंमलबजावणीबाबत सकारात्मक इच्छा व्यक्त केली. आता सर्वच क्षेत्रात 'एआय' तंत्रज्ञान झपाट्याने पुढे येत आहे.

दूध व्यवसायात हे तंत्रज्ञान ब्लॉक चेनच्या माध्यमातून आणले, तर दुधाचे उत्पादन ते वितरण व्यवस्थेवर नियंत्रणास मदत होणार आहे.

ग्राहकाच्या हातात दूध पिशवी पडल्यानंतर त्यावरील 'क्यूआर कोड'वरून दुधाचे उत्पादन ते वितरणापर्यंतचा प्रवास कळणार आहे. त्यामुळे भेसळीला प्रतिबंध येणार आहे.

प्रतिदिनी सर्वाधिक दूध उत्पादन करणारे देश
भारत - २३० मिलियन टन
अमेरिका - १०५ मिलियन टन
पाकिस्तान - ६५ मिलियन टन
चीन - ४५ मिलियन टन
ब्राझील - ३८ मिलियन टन

शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायात 'एआय' तंत्रज्ञान कसे आणता येईल, याची ब्लू प्रिंट मी पाटणा येथील कार्यशाळेत केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांना दाखविली. याबाबत केंद्रीय प्रधान सचिव अलका उपाध्ये व सहा. वर्षा जोशी यांच्यासोबत बैठक लावून त्याच्या अंमलबजावणीचे पहिले पाऊल टाकले आहे. - डॉ. चेतन नरके (सदस्य, इंडियन डेअरी असोसिएशन)

अधिक वाचा: Khillar Cow : शेतकऱ्याच्या हौसेला मोल नाही; घातले खिल्लार गाईचे डोहाळ जेवण

Web Title: AI in Dairy : Just like agriculture, AI technology will now be introduced in the dairy industry; how will it benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.