कोल्हापूर : 'अमूल'ने म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आता 'अमूल'चे दूध ७२ रुपये लिटरने मिळणार आहे. पण, 'गोकुळ' सह इतर सहकारी दूध संघाचे म्हैस दूध मुंबईत ७२ रुपयांनीच विक्री सुरू आहे.
'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' सह राज्यातील सहकारी दूध संघांनी यापूर्वीच म्हैस दूधविक्री दरात वाढ केलेली आहे. या संघांचे मुंबईत ७२ रुपये लिटरने विक्री सुरू आहे. मात्र, अमूलने दरवाढ केली नव्हती.
आता बाजारपेठेतील दुधाची मागणी वाढू लागल्याने त्यांनीही दरवाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यानंतर 'गोकुळ'सह इतर दूध संघांची भूमिका काय राहणार? याविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता लागली आहे. पण, 'गोकुळ', 'राजारामबापू'सह इतर सहकारी दूध संघ सध्यातरी म्हैस दूध विक्री दरात वाढ करणार नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
'गोकुळ'ने यापूर्वीच म्हैस दूध खरेदी व विक्री दरात वाढ केलेली आहे, त्यामुळे सध्या तरी आमचा दरवाढीचा विचार नाही. - योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ
अधिक वाचा: Maharashtra Milk Rate खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात केली कपात