Animal Care Tips : राज्यातील तापमान मागील ३ ते ४ दिवसांपासून पारा वाढताना दिसत आहे. त्यात आता पारा हा ४५.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने आता त्याचा पशुधनावर काय परिणाम होतोय ते जाणून घ्या सविस्तर (protect Animals)
खामगाव तालुक्यात तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. या तीव्र उष्णतेमुळे केवळ माणसेच नव्हे, तर जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः दुभत्या जनावरांवर याचा मोठा परिणाम होत असून, त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. (protect Animals)
शरीराचे तापमान वाढल्यास दुधात घट होऊ शकते, दुधाची प्रत घसरते, दुधातील फॅट, साखर, प्रथिने आदींची पातळी खालावते, असे पशुपालक सांगतात. जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. (protect Animals)
दुभती जनावरे जास्त दुग्धनिर्मिती करत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. (protect Animals)
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी योग्य उपायोजना कराव्यात, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून दिला जात आहे.
मागणी जास्त, पुरवठा कमी
शेतीला जोडव्यवसाय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, सध्या वाढत्या तापमानाचा दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुधाची आवश्यकता असते. मात्र, उत्पादन कमी होत आहे. त्यातच उन्हामुळे दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसून येत आहे.
तापमानामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम
खामगाव तालुक्यात तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यामुळे मानवी आरोग्याप्रमाणेच जनावरांचेही आरोग्य बिघडत आहे.
वाढत्या उन्हापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुपालकांनी योग्य काळजी गरजेचे आहे. यावर कृषी विज्ञान केंद्राव्दारे काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
हिरव्या चाऱ्यावर द्यावा भर!
* उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा खाण्यास द्यावा, मुबलक पाणी पिण्यास द्यावे. या दिवसात जनावरांना भूक कमी लागते, मात्र तहान जास्त लागते.
* यामुळे जनावरांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. साधारण दिवसातून तीनवेळा पाणी पिण्यास द्यावे. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते.
* जनावरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते.
पशुसंवर्धन विभागाचा सल्ला
* जनावरांना सावलीत ठेवावे.
* हिरवा चारा, गुळपाणी, मीठपाणी यांचा वापर करावा.
* स्वच्छ व थंड पाणी द्यावे.
* अत्यधिक तापमानात जनावरांना आराम द्यावा.
* दुभत्या जनावरांना संध्याकाळच्या वेळेत दुभते ठेवावे.