Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Animal feeding in Winter : हिवाळ्यात पशुधनाचा आहार कसा असायला हवा? त्याचे फायदे काय? वाचा सविस्तर 

Animal feeding in Winter : हिवाळ्यात पशुधनाचा आहार कसा असायला हवा? त्याचे फायदे काय? वाचा सविस्तर 

Animal feeding in Winter: What should be the diet of livestock in winter? What are its benefits? Read in detail | Animal feeding in Winter : हिवाळ्यात पशुधनाचा आहार कसा असायला हवा? त्याचे फायदे काय? वाचा सविस्तर 

Animal feeding in Winter : हिवाळ्यात पशुधनाचा आहार कसा असायला हवा? त्याचे फायदे काय? वाचा सविस्तर 

Animal feeding in Winter : हिवाळ्यात ऊर्जेची गरज वाढलेली असते. त्यामुळे पशुधनाला संतुलित आहार (Livestock feeding in winter) देणे महत्त्वाचे असते.

Animal feeding in Winter : हिवाळ्यात ऊर्जेची गरज वाढलेली असते. त्यामुळे पशुधनाला संतुलित आहार (Livestock feeding in winter) देणे महत्त्वाचे असते.

शेअर :

Join us
Join usNext

Animal feeding in Winter :  हिवाळ्यात पशुधनाला संतुलित आहार (Livestock feeding in winter) देणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात जनावरांना भरपेट आहार देणे आवश्यक असते. हिवाळ्यात जनावरांना चांगला आहार देल्याने त्यांच्या चयापचय क्रियेत वाढ होते आणि शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्यांचे शरीराचे तापमान नियमित राहते. हिवाळ्यात (Winter Season) जनावरांना संतुलित आहार देण्याचे अनेक फायदे फायदे असतात. जाणून घेऊयात नेमके आहार व्यवस्थापन कसे असावे? 

हिवाळ्यात आहार व्यवस्थापन

शरीरस्वास्थ आणि दूध उत्पादनासाठी (Milk Production) जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर दूध उत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात घट दिसून येते. कारण या काळात ऊर्जेची गरज वाढलेली असते.

  • थंड हवामानात वाढलेल्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी गाईंचा आहाराचे नियोजन करावे. 
  • शरीराचे तापमान राखण्यासाठी गाईंना जास्त ऊर्जा लागते, जनावरांना उच्च गुणवत्तेचा चारा द्यावा. 
  • आहारात चांगल्या दर्जाचे गवत, कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
  • हिवाळ्यात जास्त प्रथिनयुक्त आहार दिला गेल्यास उच्च दर्जाच्या प्रथिनांचा अधिक वापराने  अ‍ॅसिडोसिस होण्याची शक्यता असते. 
  • त्यामुळे आम्ल शोषले जात नसल्याने किण्वन पोटाचा (रुमेन) सामू कमी होतो. 
  • या  अ‍ॅसिडोसिसचा परिणाम होऊन दूध आणि दुधातील एसएनएफचे प्रमाण कमी होते. 
  • त्यासाठी गव्हाणीमध्ये पुरेसा चारा उपलब्ध आहे का? याची खात्री करावी, कोरडा चारा जितका जास्त तितकी शरीरातील ऊर्जा जास्त असते.
  • हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे जनावरांच्या शरीरातील ऊर्जा वापरली जाऊन वजन, प्रकृतिअंक (बॉडी स्कोअर) खालावतो. अशावेळी खाद्यात उर्जेचे प्रमाण अतिरिक्त वाढवून दिले पाहिजे. 
  • थंडीच्या ताणामुळे जनावराच्या शरीराची प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व इत्यादीच्या गरजा बदलत नाहीत. 
  • एका अभ्यासानुसार घटत जाणाऱ्या एक अंश फॅरनहाइट तापमानाप्रमाणे एक टक्का जास्त ऊर्जेची पूर्तता पशू आहारातून केली पाहिजे. हिवाळ्यात ऊर्जेची गरज साधारणतः १० ते २५ टक्के इतकी जास्त असते. 


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Animal feeding in Winter: What should be the diet of livestock in winter? What are its benefits? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.