Join us

राज्यात पशुसंवर्धन पंधरवडा; पशुधन उपचार, पशुपालकांच्या अडचणी सोडविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 11:42 AM

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १ ते २५ ऑगस्टच्या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्‍या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती पशुपालकांना देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १ ते २५ ऑगस्टच्या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्‍या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती पशुपालकांना देण्यात येणार आहे. 

पशुसंवर्धन पंधरवडा दरम्यान गायी, म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिरांचेही या कालावधीत आयोजन केले जाणार आहे. पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेतले जाणार आहेत.

राष्ट्रीय पशुधन अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुसंवर्धनामध्ये उद्योजकता विकास करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत शेळीपालन कुक्कुटपालन, वैरण विकास आदी नवीन प्रकल्प राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यासोबतच गावनिहाय केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माहितीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. 

'पशुसंवर्धन पंधरवडा' मधील उपक्रम

जनजागृती

• पशुपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी 'उच्च उत्पादन व प्रजनन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन' या पंचसुत्रीचे महत्त्व.• केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन योजनांमध्ये सहभागी होण्यास पशुपालकांना प्रवृत्त करणे.

लसीकरण व जंत निर्मूलन

• पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात, लम्पी चर्मरोग, घटसर्प, फर्‍या, पीपीआर, आंत्रविषार इ. रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे.• जंत निर्मूलन करणे.• बाह्य परोपजीवी निर्मूलनासाठी औषध फवारणी.

वंध्यत्व निवारण व पशु आरोग्य शिबीरे

• गोवंशीय पशुधनातील भाकड काळ कमी करण्यासाठी तपासणी.• वंध्यत्व निवारण व पशुआरोग्य शिबीर आयोजित करणे.• कृत्रिम रेतन करणे.

दूध अनुदान योजना

• योजनेचे लाभ सर्व दूध उत्पादकांना मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे.• योजना राबवितांना दूध उत्पादकास येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे.

पशुचारा, पशुखाद्य

• पशुपालन व्यवसायात सकस चारा / पशुखाद्याचे महत्त्व पशुपालकांना पटवून देणे.• चारा उत्पादन तसेच पशुखाद्य निर्मिती योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन.• 'चारा स्वयंपूर्ण गाव' संकल्पना राबविणे.

पशुगणना

• पशुगणनेचे महत्त्व विषद करणे.• २१ व्या पशुगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करणे.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेती क्षेत्रमहाराष्ट्रसरकारशेतीगाय