Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर

Approval for milk subsidy for the month of October-November; Which district will get how much subsidy? Read in detail | ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर

Dudh Anudan राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत.

Dudh Anudan राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्यातील गायदूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत.

त्यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील ४३५ कोटींचे अनुदान अजून प्रलंबित राहिले आहे. गेले वर्षभर दूध अनुदानाचे गुऱ्हाळ सुरू आहे. राज्यात गायीचे दूध उत्पादन वाढल्याने डिसेंबर २०२३ पासून गाय दूध खरेदी दरात संघांनी कपात केली होती.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान जाहीर केले.

हे अनुदान शेतकऱ्यांना वेळेत मिळाले. उन्हाळ्यातही दर वाढले नसल्याने शासनाने जुलै ते सप्टेंबर महिन्यातील दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

तोपर्यंत निवडणूक तोंडावर आल्याने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देत असताना अनुदान सात रुपयांपर्यंत वाढवले; पण, सहा-सात महिन्यांचा कालावधी संपला तरी जुलै ते सप्टेंबरचे अनुदान मिळाले नव्हते.

शासनाने अर्थसंकल्पात नोव्हेंबरपर्यंतचे अनुदान देण्यासाठी ७८५ कोटींची तरतूद केली; पण दुग्ध विभागाकडे ३३९ कोटींचे पाठवले

यातून सप्टेंबरपर्यंतचे प्रलंबित १६० कोटी प्राधान्याने दिले जाणार आहे, उर्वरित १८८ कोटी नोव्हेंबरपर्यंतचे दिले जाणार आहे; ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी ६२३ कोटी ८५ लाखांची गरज असल्याने अजून ४३५ कोटी द्यावे लागणार आहेत.

असे मिळणार अनुदान (कोटींत)
जिल्हा - अनुदान
अहिल्यानगर - २२१
पुणे - १८५
सोलापूर - ११८
सांगली - ७५
कोल्हापूर - ५२
सातारा - ४४
नाशिक - २९
संभाजीनगर - २४
धाराशिव - १६
बीड - ११
जळगाव - ९
नागपूर - १
धुळे - १
लातूर - ०.७१
बुलढाणा - ०.६५
जालना - ०.५८
अमरावती - ०.४६
भंडारा - ०.४५
वर्धा - ०.१३
नांदेड - ०.०९
परभणी - ०.०५

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील १८८ कोटी यातून दिले जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना या महिन्याअखेर अनुदान वितरित करण्याचा प्रयत्न आहे. - प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्धव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी दिवसाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर

Web Title: Approval for milk subsidy for the month of October-November; Which district will get how much subsidy? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.