केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच २१ वी पशुगणना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत पशुगणना करून प्रत्येक जिल्ह्यातील जनावरांचा आकडा समोर येणार आहे.
पशुगणना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला पर्यवेक्षक व प्रगणक यांची नियुक्ती करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तीन हजार घरांसाठी एक प्रगणक याप्रमाणे कर्मचारी आहेत.
चार महिने चालणार पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील पशुगणना होणार आहे. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तसेच पदवीधारक विद्यार्थ्यांना प्रगणक म्हणून या मोहिमेत सहभागी होता येणार आहे.
मोबाइल अॅपच्या माध्यमातून गणना विकसित मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे. यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांना माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक घरी जाऊन या विकसित मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रगणक ही गणना करणार आहेत. चार महिन्यांनंतर ही पशुगणना सुरु होणार आहे.
प्रगणक, पर्यवेक्षकांची नेमणूकजिल्ह्यातील २१ वी पशुगणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. या प्रगणक, पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देऊन दि. १ जुलैपासून पशुगणना सुरु करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा: Lumpy Skin लंपी चर्मरोगासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही