Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेती नसेल तरीही तुम्ही कमी वेळेत, कमी खर्चात घेऊ शकाल ह्या पौष्टीक चाऱ्याचे उत्पादन

शेती नसेल तरीही तुम्ही कमी वेळेत, कमी खर्चात घेऊ शकाल ह्या पौष्टीक चाऱ्याचे उत्पादन

Azolla is a great alternative to animal feed | शेती नसेल तरीही तुम्ही कमी वेळेत, कमी खर्चात घेऊ शकाल ह्या पौष्टीक चाऱ्याचे उत्पादन

शेती नसेल तरीही तुम्ही कमी वेळेत, कमी खर्चात घेऊ शकाल ह्या पौष्टीक चाऱ्याचे उत्पादन

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पशुखाद्याच्या किमतीमुळे त्याला स्वस्त पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. असा कमी खर्चिक व प्रथिनांचा आणि क्षार मिश्रणाचा पुरवठा करणारा पर्याय म्हणजे 'अझोला'.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पशुखाद्याच्या किमतीमुळे त्याला स्वस्त पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. असा कमी खर्चिक व प्रथिनांचा आणि क्षार मिश्रणाचा पुरवठा करणारा पर्याय म्हणजे 'अझोला'.

शेअर :

Join us
Join usNext

फक्त हिरवा किंवा वाळलेला चारा यातून जनावरांचे पूर्ण पोषण होऊ शकत नाही. त्यासाठी उच्च प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे व क्षार मिश्रण असलेले पशुखाद्य योग्य प्रमाणात जनावरांना पुरविणे आवश्यक आहे.

पशुखाद्य योग्य प्रमाणात खाऊ घातल्याशिवाय उच्च व नियमित दुग्धोत्पादन असावा. मिळणे अशक्य आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पशुखाद्याच्या किमतीमुळे त्याला स्वस्त पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. असा कमी खर्चिक व प्रथिनांचा आणि क्षार मिश्रणाचा पुरवठा करणारा पर्याय म्हणजे 'अझोला'.

अझोला म्हणजे काय ?
अझोला ही एक फर्न प्रजातीची वनस्पती असून तिच्याबरोबर सूक्ष्म नील हरित शेवाळ वाढत असते, ते पाण्यावर जोमदार व वेगाने वाढते. ह्यात २५-३५% प्रथिने, १०-१५% क्षार खनिजे असतात. ह्यामुळे पशुखाद्याला एक सर्वोत्तम पर्याय म्हणून अझोला जनावरासाठी वापरण्यात येते.

अझोला निर्मिती
- अझोला निर्मिती साठी १० ते १२ इंच  साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते.
ह्यासाठी तयार अझोला बेड वापरू शकतो किंवा जमीन सपाट करून त्यावर चौकोनी आकारात दोन विटांचा थर देवून त्यात प्लास्टिक कागद अथरून पाणी साठवण्याची सोय करावी.
हा बेड एका जनावरासाठी साधारणतः ४ बाय १२ फुटांचा असावा.
ह्या बेडमध्ये ४ ते ५ घमेले चाळलेली मऊ माती व १ घमेले पूर्ण कुजलेले शेण खत चाळून पसरावे.
यावर १० ते १२ इंचापर्यंत पाणी भरून घ्यावे. ह्यात सुरवातीला एक किलो अझोला कल्चर सोडावे.
पुढील १२ ते १४ दिवसांत पूर्ण बेड भरून अझोला वाढेल व त्यानंतर रोज साधारणतः एक ते दीड किलो अझोला उत्पादन मिळेल.
हा बेड झाडाच्या सावलीत करावा किंवा शेडनेट वापरून सावली करावी.

अझोला बेडची काळजी
अझोला उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
- बेडमध्ये वेळोवेळी नवीन पाणी सोडून कमी होणाऱ्या पाण्याची पातळी योग्य ठेवावी.
- महिन्यातून एकदा संपूर्ण पाणी बदलावे व एक घमेले कुजलेले शेणखत घालावे.
ताजे शेण किंवा जास्त प्रमाणात रासायनिक खते वापरल्यास अझोला करपतो व वाढ खुंटते.
३-४ महिन्यातून एकदा बेड मधील संपूर्ण माती बदलावी जेणे करून अझोल्यातील क्षार व खनिजांचे प्रमाण टिकून राहील.

अझोला खाऊ घालताना घ्यावयाची काळजी
एका बेड मधून रोज एक ते दीडच किलो अझोला चाळणीने काढून घ्यावा. तो स्वच्छ पाण्यात धुवून थोडावेळ सावलीत सुकवावा जेणेकरून शेणाचा वास निघून जाईल. सुरवातीला अझोला थोडा थोडा करून पशुखाद्यात मिसळून खाऊ घालावा. पुढे आवड निर्माण झाल्यावर स्वतंत्रपणे अझोला खावू घालता येतो. दररोज जास्तीत जास्त दीड ते दोन किलो अझोला एका जनावरास खाऊ घालता येतो व तितके पशुखाद्य कमी करावे.

अझोलाचे फायदे
- अत्यल्प उत्पादन खर्च.
- दुग्धोत्पादन वाढ होऊन ती टिकवून ठेवण्यास मदत होते.
- जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते.
- सहा महिन्यांच्या पुढील कालवडींना दररोज खाऊ घातल्यास वाढ चांगली होऊन लवकर वयात येण्यास मदत होते.
- पशुखाद्याच्या खर्चात बचत झाल्याने नफ्यात वाढ होते.

अधिक वाचा: उन्हाळ्यातही दुध उत्पादन कमी होणार नाही.. दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी

Web Title: Azolla is a great alternative to animal feed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.