Join us

Bakri Eid Qurbani: आटपाडीच्या बाजारामध्ये बोकडास मिळाली लाखाची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 3:30 PM

आटपाडी येथील शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिवारच्या बाजारामध्ये विक्रमी उलाढाल झाली. सोमवारी बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर तीन कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाले.

आटपाडी: आटपाडी येथील शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिवारच्या बाजारामध्ये विक्रमी उलाढाल झाली. सोमवारी बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर तीन कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाले.

सांगोला येथील रियाज शेख यांचा बोकड १ लाख ११ हजार १११ रुपयांना फिरोज अकबर शेख (रा. पंढरपूर) यांनी खरेदी केल्याचे बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी सांगितले.आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजारांहून अधिक शेळ्या मेंढ्या व बकऱ्यांची आवक झाली होती.

जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी बाजारास भेट देत बाजार समितीने दिलेल्या सोयी- सुविधांची माहिती घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, मुन्नाभाई तांबोळी, रावसाहेब सागर, विजय देवकर उपस्थित होते.

आटपाडी बाजार समितीमध्ये सुरू असलेला आठवडा शेळी-मेंढी बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेळी, मेंढी, बोकडाला चांगला दर मिळत असल्याने आसपासचे शेतकरी, तसेच कराड, पाटण, पुणे, बारामती, इंदापूर, अकलूज, सांगली, तासगाव या भागांतील व्यापारी येतात. - संतोष पुजारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी

अधिक वाचा: आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता

टॅग्स :बकरी ईदबकरी ईदशेळीपालनशेतकरीबाजारमार्केट यार्डसांगली