Join us

दुग्ध व्यवसायात वासरांची शिंगे जाळण्याचे फायदे; शिंगे जाळण्याच्या पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:44 IST

Dairy : दुग्ध व्यवसाय करत असतांना कालवड संगोपणात महत्वाचे असते ते म्हणजे वासरांचे शिंग जाळणे. 

दुग्ध व्यवसाय करत असतांना कालवड संगोपणात महत्वाचे असते ते म्हणजे वासरांचे शिंग जाळणे. 

वासरांची शिंगे काढण्याच्या या प्रक्रियेला डिसबडिंग असेही म्हणतात. यामध्ये वासरू लहान असतानाच त्यांची शिंगनळी जाळली जाते, ज्यामुळे शिंगांची वाढ थांबते.

दूध उत्पादनाच्या दृष्टीने शिंगांचे फारसे महत्त्व नसते, त्यामुळे शिंगे लवकर काढणे एक उपयुक्त पद्धत आहे. 

शिंगे काढण्याची पद्धत

शिंगनळी जाळताना वासरू फारसे मोठे नसावे, म्हणजे एका आठवड्याच्या आतच हे करणे योग्य ठरते. यावेळी शिंगाच्या वाढीला कारणीभूत असलेल्या पेशी नष्ट केल्या जातात. यामुळे शिंगाचे मूळ कपालयुक्त कवटीपासून वेगळे होऊन सहजपणे काढता येते.

शिंगे काढण्यासाठी विविध पद्धती

• लाल तापलेले लोखंड (Hot Iron Method) : शिंगनळी जाळण्यासाठी लाल तापलेले लोखंड वापरले जाते. जखमेवर अँटिसेप्टिक क्रीम लावणे आवश्यक असते.

• रासायनिक पद्धत (Chemical Method) : शिंगांच्या वाढीस अटकाव करणारे रसायन लावले जाते.

• शिंगे काढल्यावर जर तेथे कीटक झाल्यास जखमेवर फ्लाय रिपेलेंट लावणे आवश्यक असते.

शिंगे काढण्याचे योग्य वय

गायीचे वासरू : १० ते १५ दिवसांचे वय असताना शिंगनळी जाळावी.

म्हशीचे वासरू : ७ ते १० दिवसांचे वय असताना शिंगनळी काढणे योग्य ठरते.

शिंगे काढण्याचे फायदे

• शिंगे नसलेल्या जनावरांना कमी जागेत ठेवता येते. परिणामी जागेची बचत होते.

• शिंगे नसल्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी होते.

• शिंगे नसलेल्या जनावरांची काळजी घेणे व त्यांना हाताळणे अधिक सोपे जाते.

• काही प्रजातींच्या शिंगे आत वळलेली असतात, त्यामुळे त्याने जखम होण्याचा धोका असतो.

वासरांची शिंगे काढणे ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे. यामुळे जनावरांचे आरोग्य आणि व्यवस्थापन सुलभ होते. योग्य पद्धतीने आणि वेळेवर ही प्रक्रिया केल्यास जनावरांना त्रास होत नाही. 

टीप : सदरील प्रक्रिया करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक आहे.

हेही वाचा : लोकसंख्येसोबत दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योगात आहेत मोठ्या संधी; वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतीशेती क्षेत्रदूध