दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
दुधाचे आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपणास ठाऊकच आहे. पण हेच दूध हाडांना मजबूती देण्यासोबतच वजन कमी करण्यासही फारच लाभदायक मानले जाते. तर जाणून घ्या नियमित दूध प्यायल्याने अजून कोणकोणते फायदे आपल्या आरोग्यास होतात?
दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. ऋषी मुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. आजही गावाच्या ठिकाणी गायीचं ताज दूध काढून पिणे अति लाभदायक मानले जाते. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे असतात.
दुधाचे महत्त्व जगाला सांगण्यासाठी दरवर्षी १ जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस फूड आणि कल्चर ऑर्गनायझेशनने सुरु केला होता. या दिवशी दुधासोबतच दुधापासून तयार होणाऱ्या अन्य पौष्टिक पदार्थांबाबत लोकांना जागरुक केले जाते. ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही त्यांनी दुग्धजन्य पदार्थ तरी किमान खाल्लेच पाहिजेत. स्मुदीज, शेक्स, कॉफी, ओटमिल यांसारखे दुधाचा समावेश असलेले, पदार्थ खाल्ल्याने सुद्धा शरीराला पोषकता मिळते.
दुध हे पौष्टिकतेची मोठी संपन्न खाण आहे हे आम्ही मगाशीच सांगितलंच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त दुधात कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड' असते जे हृदय सुदृढ राखतात आणि आपले वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटस घटक सुध्दा असतात. त्यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात आता आपण जाणून घेऊया की दुधाचे सेवन केल्याने शरीराला काय काय फायदे होतात.
हाडे मजबूत होतात
दुधामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड', फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. हे सर्व घटक हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एका संशोधनाच्या अनुसार दुध पायल्याने हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. सगळ्यात महत्त्वाचा फायद म्हणजे दुध जास्त प्यायल्याने दात अतिशय मजबूत होतात. जर तुम्ही दुध पिण्यास टाळाटाळ करत असाल तर या दोन फायद्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दुधाचे सेवन आवर्जून केले पाहिजे.
हृदय सुदृढ राहते
बऱ्याच जणांचा या गोष्टीवर विश्वास नाही की दुध हे हृदयाचे स्वस्थ सुदृढ राखण्यास मदत करते, पण ही गोष्ट खरी आहे. एका संशोधनाच्या अनुसार ही गोष्ट सिद्ध करण्यात आली आहे. दुधामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब संतुलित ठेवते. यामुळेच हृदयाशी निगडीत आजार आणि समस्यांना आळा बसतो. परंतु या संशोधनातून असेही सांगितले गेले की गायीचे दुध हे कमी प्रमाणात प्यावे. अधिक प्रमाणात प्यायल्याने हृदयाचे स्वास्थ अधिक बिघडू शकते. कारण दुधामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असते यामुळे हृदयाशी निगडीत समस्या तुम्हाला विळखा घालू शकतात.
वजन कमी होते
आपल्या आहारात दुधाचा समावेश केल्याने वजन अतिशय नियंत्रित राहते आणि वाढलेले वजन कमी सुद्धा होते. दुध दररोज पायल्याने पोट सुद्धा जास्त सुटत नाही. एका संशोधनातून हे सांगितले गेले आहे की बालपणात योग्य प्रमाणात दुध प्यायल्याने मुलांचे वजन जास्त वाढत नाह. दुधात असलेली प्रथिनाची मात्रा शरीराला पोषण प्रदान करते याशिवाय दुधात असलेले कॅल्शियम शरीरातील मेटाबोलिज्म वाढवते. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून वजन नियंत्रणात राहते.
डॉ.श्रीकांत मोहन खुपसे
सहाय्यक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर मो. ८६०५५३३३१५
व
डॉ.एन.एम.मस्के
प्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर मो. ९४२३४७१२९४