Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Benefits of Mineral Mixture : आता गोळी न देता गाई येतील माजावर फक्त त्यानं दररोज खाऊ घाला खनिज मिश्रणाची पावडर

Benefits of Mineral Mixture : आता गोळी न देता गाई येतील माजावर फक्त त्यानं दररोज खाऊ घाला खनिज मिश्रणाची पावडर

Benefits of Mineral Mixture : Now cows will come to Heat without giving pills, just feed them every day the powder of mineral mixture | Benefits of Mineral Mixture : आता गोळी न देता गाई येतील माजावर फक्त त्यानं दररोज खाऊ घाला खनिज मिश्रणाची पावडर

Benefits of Mineral Mixture : आता गोळी न देता गाई येतील माजावर फक्त त्यानं दररोज खाऊ घाला खनिज मिश्रणाची पावडर

Benefits of mineral mixture In Dairy Animal : शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाई म्हशींचे संगोपन करतात. ज्यांच्या दूध विक्रीतून बऱ्याचदा शेतकरी कुटुंबाची काहीअंशी आर्थिक गरज देखील भासली जाते. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना गाई म्हशींचे संगोपन करतांना अनेक अडचणी देखील येतात.

Benefits of mineral mixture In Dairy Animal : शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाई म्हशींचे संगोपन करतात. ज्यांच्या दूध विक्रीतून बऱ्याचदा शेतकरी कुटुंबाची काहीअंशी आर्थिक गरज देखील भासली जाते. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना गाई म्हशींचे संगोपन करतांना अनेक अडचणी देखील येतात.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून गाई म्हशींचे संगोपन करतात. ज्यांच्या दूध विक्रीतून बऱ्याचदा शेतकरी कुटुंबाची काहीअंशी आर्थिक गरज देखील भासली जाते. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना गाई म्हशींचे संगोपन करतांना अनेक अडचणी देखील येतात.

ज्यात प्रामुख्याने वेळेवर माज न दाखविणे, गाभ न जाणे, वेल्यानंतर अचानक दूध उत्पादन घटणे तसेच वारंवार जनावरं आजारी पडणे. अशावेळी शेतकरी मोठ्या आर्थिक तोट्यात जातो. यासाठी वैद्यकीय अधिकारी वारंवार जनावरांना नियमित खनिज मिश्रण आहारतून देण्याचा सल्ला देतात. 

जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि उच्च दूध उत्पादनासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र या सोबतच त्यात खनिज मिश्रणांचा समावेश देखील अत्यंत गरजेचा आहे.

खनिज मिश्रण म्हणजे विविध प्रकारच्या खनिजांचे संयोग असलेली पावडर किंवा वीट जी जनावरांना त्यांच्या शरीराच्या विविध आवश्यकतेनुसार दिली जाते. हे मिश्रण जनावरांच्या आहारात जोडल्याने त्यांना अनेक फायदे होतात. यातील काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. 

हाडांचे मजबूतीकरण

खनिज मिश्रणात कॅल्शियम आणि फॉस्फरस हे महत्त्वाचे खनिज समाविष्ट असतात. ज्यामुळे कॅल्शियम हाडांची मजबूती वाढवतो, तर फॉस्फरस हाडांची वाढ आणि टिकाव सुदृढ करतो. यामुळे जनावरांची हाडे मजबुत राहतात. 

पचन क्रियेमध्ये मदत

खनिज मिश्रणामध्ये जस्त आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. या खनिजांचा वापर जनावराच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करतो ज्यामुळे खाद्याची चांगली पचनी होऊन पोषण अधिक मिळते.

रोग प्रतिकारक क्षमता अधिक बळकट होणे

खनिज मिश्रणांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे अशा प्रकारे समाविष्ट केली जातात की ती जनावरांच्या रोगप्रतिकारक क्षमतेला उत्तेजन देतात. झिंक (जस्त) आणि सेलेनियम हे खनिज जनावरांच्या रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट करतात. ज्यामुळे गुरे अधिक रोग प्रतिबंधक होतात.

दूध आणि मांस उत्पादनात सुधारणा

खनिज मिश्रणाचा योग्य वापर केल्याने जनावरांच्या दूध आणि मांस उत्पादनात सुधारणा होऊ शकते. कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजांचा संतुलित वापर यामुळे जनावरांच्या शरीरातील पोषणाची पातळी उच्च राहते ज्यामुळे दूध आणि मांस उत्पादन वाढते.

दूध उत्पादनाची गुणवत्ता

खनिज मिश्रणाच्या योग्य वापरामुळे दूध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकते. उच्च दर्जाचे दूध उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी शरीरात योग्य पोषणाची संतुलन आवश्यक असते, ज्यात खनिजांचा महत्त्वपूर्ण भूमिका असतो. खनिज मिश्रणात असलेल्या कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि मॅग्नेशियमसारख्या घटकांचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात, ज्यामुळे दूध अधिक पौष्टिक आणि चांगले असते.

वेळोवेळी माज दाखवणे 

खनिज मिश्रणात असलेले जस्त, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिज जनावरांच्या हार्मोनल संतुलनावर सकारात्मक परिणाम करतात. यामुळे गाई किंवा म्हशीच्या शरीरातील हार्मोनांच्या कार्यक्षमता वाढते ज्यामुळे वेळेवर माज दाखवणे शक्य होते.

हेही वाचा : Dairy Animal Breeding : उच्च दूध उत्पादनाची कालवड आता गोठ्यातच तयार होणार; 'या' सिमेन स्टेशनची मिळणार घरपोहच सेवा

Web Title: Benefits of Mineral Mixture : Now cows will come to Heat without giving pills, just feed them every day the powder of mineral mixture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.