Join us

मोठी बातमी! दुध अनुदानाला एका महिन्याची मुदतवाढ; १० मार्चपर्यंत मिळणार ५ रूपयांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 7:58 PM

राज्य सरकारने यासंदर्भातील शासनादेश काढला आहे.

राज्य सरकारने दुधाचे दर कमी झाल्यामुळे ११ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत दुधाला प्रतिलीटर ५ रूपये अनुदान जाहीर केले होते. तर त्यानंतर राज्य सरकारने आता दुधावरील या अनुदानाची मुदत आणखी एक महिन्यांनी वाढवली असून दुधासाठी येणाऱ्या १० मार्चपर्यंत पाच रूपयांचे अनुदान मिळणार आहे. यासंदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे. 

दरम्यान, राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलीटल २४ ते २६ रूपयांचा दर मिळत असल्याने राज्य सरकारने ११ जानेवारीपासून दूध उत्पादकांना प्रतिलीटल ५ रूपयांचे अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान केवळ एका महिन्यासाठी होते. तर त्यानंतर या महिन्यात पुन्हा सरकारने या अनुदानाची मुदत  एका महिन्याने वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता १० मार्चपर्यंत अनुदान मिळणार आहे. 

दूध अनुदान मिळवण्याची अटीदूध अनुदान मिळवण्यासाठी अटी व शर्ती जीवघेण्या असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. ज्या शेतकऱ्यांना दूध संघाकडून २७ रूपये प्रतिलीटल दर मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनाच दूध अनुदानाचा फायदा घेण्यात येणार असल्याची मागच्या शासन आदेशात अट घातली होती. त्याचबरोबर दूध अनुदानाची मुदत संपल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसाय