Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ

बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ

Biogas Samriddhi Yojana implemented by Gokul for biogas, how farmer is getting benefit | बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ

बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले असून, त्यातून तब्बल ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात 'गोकुळ' आघाडीवर असून, सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघातर्फे 'एन. डी. डी. बी. मृदा व सिस्टीमा बायो कंपनी'च्या माध्यमातून समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली आहे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले असून, त्यातून तब्बल ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात 'गोकुळ' आघाडीवर असून, सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यामध्ये घरच्या घरी शेणापासून इंधन तयार करता यावे, त्याचबरोबर गॅस सिलिंडरवर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी 'गोकुळ'च्या दूध उत्पादकांसाठी ही योजना राबवली आहे.

हिल्या टप्प्यात पाच हजार बायोगॅसचे उद्दिष्ट दिले असले, तरी त्यापेक्षा अधिक युनिट उभारली आहेत. अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २० कोटी २५ लाख ५५ हजार ६१० रुपये मिळाले आहेत.

अशी आहे बायोगॅस योजना
-
युनिटची किंमत - ४१२६०
- सिस्टीमा कंपनीकडून अनुदान - ३५२७०
- दूध उत्पादकाचा हिस्सा - ५९९०

हे आहेत फायदे
-
महिलांना गोठ्यातून लांब शेणाची वाहतूक करून शेणी लावणे, त्या सुकवणे वाचते.
- शेण व मलमूत्राचा उठाव वेळेत होत असल्याने गोठा कायम स्वच्छ राहतो.
- कमी खर्चातील युनिटमधून मुबलक गॅस उत्पादन व घरातील चुलीचा धूर बंद.
- दहा वर्षे युनिटची देखभाल सिस्टीमा कंपनी करणार.
- 'गोकुळ' संघालाही प्रति युनिट ५०० असे २८ लाख ७१ हजार ५०० रुपये अनुदान.

युनिटच्या दरात वाढ शक्य
गोकुळ'ने २०२४-२५ या वर्षात आणखी दहा हजार बायोगॅस युनिटची मागणी केली आहे. दूध उत्पादकांकडून मागणी वाढू लागली आहे. पण, युनिटच्या दरात वाढ होण्याची शक्यताही आहे.

स्लरी शेतीला उपयुक्त
बायोगॅसमधील स्लरी शेताला खत म्हणून उपयुक्त आहे. या प्रकल्पातून हजारो टन स्लरीचे उत्पादन होते. बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा वापर केला तर शेतकऱ्यांची बचत होणार आहे.

ही योजना संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक व कार्यकारी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली 'गोकुळ'ने अतिशय प्रभावीपणे राबवली. शेतकऱ्यांची मागणी पाहता या वर्षात दहा हजार युनिट उभारण्याचा मानस आहे. - नीता कामत (वरिष्ठ अधिकारी, महिला नेतृत्व, गोकुळ)

अधिक वाचा: Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती

Web Title: Biogas Samriddhi Yojana implemented by Gokul for biogas, how farmer is getting benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.