Join us

Buffalo Market : सोलापूर बाजारात जाफराबादी, मुऱ्हा म्हशींचे मार्केट वाढले; तीन कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:50 IST

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोरेगाव येथील २० एकर जागेवर जनावरांचा बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात जाफराबादी, मुऱ्हा म्हशींनी भाव खाल्ला.

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोरेगाव येथील २० एकर जागेवर जनावरांचा बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात जाफराबादी, मुऱ्हा म्हशींनी भाव खाल्ला.

खरेदीदारांनी या म्हशी घेण्याला प्राधान्य दिले. संपूर्ण बाजारात तीन कोटींहून अधिकची उलाढाल झाली. यात्रेच्या ४५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाजार विजापूर रोड येथील रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात न भरता सोरेगाव येथे भरला.

अनेक शेतकरी व पशुपालकांना बाजार कुठे भरेल याची माहिती नव्हती. मंदिर समितीकडून याबाबत जागृती करण्यात आली. त्यामुळे सोरेगाव येथील २० एकर जागेवर पशुपालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. जनावरांचे प्रकार त्यांचे आरोग्य पाहून रोज खरेदीचे नवनवे विक्रम नोंदविण्यात आले.

गाय, म्हैस व बैल यांची विक्री कमीत कमी एक लाखांपासून झाली. जाफराबादी म्हैस, मुऱ्हा म्हैस, पंढरपुरी म्हैस, आदींना हैदराबाद व तेलंगणाहून आलेल्या व्यापारी व पशुपालकांना अधिक पसंती दिली. त्या राज्यामध्ये दुधाचे कमी उत्पन्न आहे.

तसेच चांगल्या प्रतीची जनावरे तिथे मिळत नसल्याने सोलापुरातून मोठी खरेदी झाली. अनेक व्यापारी सोलापुरातून कमी दरात खरेदी करून त्यांच्या भागात अधिक दराने जनावरांची विक्री करतात. 

पुढील वर्षी घोडेही येणारकोरोनापूर्वी भरत असलेल्या जनावरांच्या बाजारात घोड्यांची विक्री होत होती. कोरोनामुळे बाजारात खंड पडला. त्यामुळे त्यानंतर झालेल्या बाजार घोडे विक्रेते आले नाहीत. यावर्षी घोड्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जनावर बाजार समितीची भेट घेतली. पुढील वर्षापासून बाजारात घोडे आणणार असल्याचे सांगितले.

दोन मंगळवारी भरेल बाजारगुरुवारपासून शेतकरी व पशुपालक आपल्या घराकडे निघाले. शनिवारी बाजार पूर्ण रिकामा झाला. आता मंगळवार, २१ जानेवारी व २८ जानेवारीला एका दिवसासाठी बाजार पुन्हा भरेल. या दरम्यान सोलापूर जिल्हा व शेजारील जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी व पशुपालक हजेरी लावतील.

अधिक वाचा: Pashusavardhan Vibhag Maharashtra : पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना क्रांतिकारक ठरण्यासाठी काय करावं लागेल? वाचा सविस्तर

टॅग्स :बाजारसोलापूरगायमार्केट यार्डपंढरपूर