Join us

म्हशीच्या दूधाला प्रतिलिटर खर्च ७८ रुपये, सरकार देतयं ४९.५० रुपये !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 4:00 PM

तूट भरून निघणार कशी? : दुग्धव्यवसाय विकास विभागानेचा दिला खर्चाचा तपशील

वाढत्या खर्चाच्या तुलनेत दुग्ध व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. एकीकडे सरकारचेच दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी म्हशीच्या एक म्हैस लिटर दूध उत्पादनासाठी ७८ रुपये ९२ पैसे, तर गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ४५ रुपये ९७ पैसे खर्च येतो, अशी लेखी कबुली देताहेत आणि दुसरीकडे हेच सरकार म्हैस व गायीच्या दुधासाठी अनुक्रमे ३४ व ४५.९७ रुपये दर देत आहेत. एक लिटर दूध उत्पादनावर होणारा खर्च आणि मिळणारा दर यामधील तफावत पाहता, सरकारच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडतेय की काय, असा प्रश्न पडतो.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. आठ ते दहा वर्षांपूर्वी खुराकाचे दर फारसे नव्हते. मात्र, मागील काही वर्षांत पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले. हे पशुखाद्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले. चाऱ्याचे दरही भडकले. या सर्व बाबींवर होणारा खर्च विचारात घेऊन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रतिलिटर दूध उत्पादनासाठी येणारा खर्च माहिती अधिकारात लेखी स्वरूपात दिला आहे.

त्यानुसार गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ४५.९७ रुपये खर्च येतो. मात्र, सरकारकडून या दुधासाठी प्रतिलिटर ३४ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच ११.९७ रुपयांची तफावत येते. म्हशीच्या दुधाला मिळणारा दर आणि होणारा खर्च यातही कुठे ताळमेळ नाही. ७८.९२ रुपये प्रतिलिटर खर्च येत असताना सरकारकडून ४५.९७ रुपयांवर बोळवण केली जात आहे.

म्हणजेच ३२ रुपये ९५ पैशांची तूट येत करीत आहे, असा आरोप शेतकरी करू आहे. म्हणजेच उत्पादन खर्चापेक्षा लागले आहेत. याच धोरणाविरोधात कमी दर देऊन सरकार दुग्ध उत्पादक आता शेतकरी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम घेताना दिसताहेत.पशुपालक शेतकऱ्यांची उन्नती नव्हे, नशिबी कर्जबाजारीपणा......

■  गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४५.९७ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७८.९७ रुपये उत्पादन खर्च येतो.

■ हे कोण्या शेतकऱ्याचे वा तज्ज्ञाचे मत नाही, तर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकायांनी माहिती अधिकारात लेखी स्वरूपात दिले आहे. असे असतानाच सरकार मात्र गायीच्या दुधासाठी ३४ रुपये व म्हशीच्या दुधाला ४९.५० रुपये दर जाहीर करते.

■ परिणामी या जोडधंद्यातून शेतकऱ्यांची उन्नती नव्हे, कर्जबाजारी होण्याची नामुष्की ओढावत आहे.

तरच दुधाला मिळतो, ३४ रुपये दर

३.५ फॅट व एसएनएफ ८.५ असेल तरच गायीच्या दुधाला ३४ रुपये दर कायम ठेवून पूर्वी फॅट व एनएनएफ हे १ पॉइंटने कमी झाल्यानंतर अनुक्रमे २० पैसे व ३० पैसे कपात केली जात होती. ती आता फॅटसाठी ५० पैसे व एसएनए फसाठी ७५ ते १०० रुपये कपात करण्यात आली आहे. म्हणजे, जाहीर केल्याप्रमाणे दुधाला दर मिळेलच, याची शाश्वती देता येत नाही.

काय म्हणतात शेतकरी.....

खर्चावर १५ टक्के नफा का नाही?

# सरकारकडून गाई, म्हशीच्या दुधासाठी उत्पादन खर्चा- "प्रमाणेही दर दिला जात नाही. प्रतिलटर येणारा खर्च आणि मिळणारा दर यात दहा ते पंधरा रुपयांची तूट आहे. त्यामुळे शासनाने उत्पादन खर्चावर १५ टक्के नफा गृहित धरून दुधाला दर देणे अपेक्षित आहे. परंतु, सरकार त्यास राजी नाही. वेळोवेळी मागणी करूनही ती बेदखल केली जात आहे, असा अरोप शेतकरी औदुंबर धोंडगे यांनी केला आहे.

तर १० पैसेच कपात असावी

३.५ व ८.५ फॅट वा डिग्रीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३४ रुपये दर कायम ठेवावा. यानंतर फॅट व एसएनएफ कमी-अधिक लागल्यानंतर १० पैशांची कपात करावी अथवा १० पैशांची वाढ करण्यात यावी आणि दूध संकलन केंद्र चालकांनी काढलेले नवीन दरपत्रकही रद्द करण्यात यावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संभाजी नहाने यांनी केली.

शेतकरी कसा जगेल?

एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती साथ देत नाही. साथ दिलीच तर बाजारपेठेत दर मिळत नाही. त्यामुळे शेती नेहमीच तोट्यात जात आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. मात्र, येथेही उत्पादन खर्च आणि सरकारचा दर यात कुठेही ताळमेळ बसत नाही. प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपयांपर्यंत तूट येत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कशाच्या भरवशावर जगेल. अशा अडचणींमुळे हतबल होऊनच मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील ११३ शेतकयांनी मृत्यूला जवळ केले. आता तरी शासनाने दूध उत्पादक शेतकयांची व्यथा ऐकून घ्यायला हवी, अशी अपेक्षा विजयकुमार धोंगडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधदूध पुरवठागाय