Join us

परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:38 AM

'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ करणार आहोत.

'गोकुळ'शी संलग्न दूध उत्पादकांना परराज्यातील म्हैस खरेदी अनुदानात ५ हजार रुपयांची वाढ केल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली. म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून दूध व्यवस्थापन संस्थांच्या म्हैस खर्चात प्रतिलिटर ८० पैशांची वाढ करणार असून, आता २.२० रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दूध फरकापोटी १०४ कोटींची रक्कम देणार असल्याचेही अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात पाच हजारांची वाढ करणार आहोत. वासाच्या दुधाला चांगल्या दुधाच्या तुलनेत कमी दर मिळत होता. आता त्यामध्येही वाढ करण्याची भूमिका असून, लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. 

'गोकुळ'ची उलाढाल ३,४२८ कोटी - उलाढाल ३,४२८ कोटी (गतवर्षी पेक्षा ४९९ कोटी)- म्हैस दुधाचा खरेदी दर ५५.०६ रुपये, तर गाय दुधाचा खरेदी दर ३७.३६ रुपये- परराज्यातून १,६४० म्हैस खरेदी- संघाकडे येणाऱ्या दुधाला १ रुपये ८२ पैसे परतावा देणार गोकुळ एकमेव- म्हैस दुधाला ५.४२ टक्के व गाय दुधाला ५.१६ टक्के दर फरक- दूध फरक, डिबेंचर व्याज, लाभांशापोटी १०४ कोटी- बायोगॅस योजनेतून दूध उत्पादकांना १७ कोटी ६० लाखांचे अनुदान- म्हैस दुधाला संस्थांना व्यवस्थापन खर्चात प्रतिलीटर ८० पैशांनी वाढ करणार- गेल्या वर्षीपेक्षा प्रति दिन सरासरी १ लाख ४ हजार लीटरने विक्रीत वाढ- अहवाल सालात सेवा सुविधा व अनुदानापोटी १९ कोटी ८३ लाख दिले.

टॅग्स :दुग्धव्यवसायगोकुळकोल्हापूरदूधदूध पुरवठा