Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Cabinet approves 492 crore proposal for veterinary degree college to be set up in Ahmednagar | अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

शेतकरी, विद्यार्थी, पशुपालकांना होणार फायदा

शेतकरी, विद्यार्थी, पशुपालकांना होणार फायदा

शेअर :

Join us
Join usNext

पशुपालनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील सावळी विहिर खुर्द येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजूरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय कृषी आयोगाने प्रत्येकी ५ हजार प्रौढ पशुंसाठी एका पशुवैद्यकाची शिफारस केलेली आहे. सध्या देशात पशुवैद्यकांची ५० टक्के कमतरता आहे. राज्यातील पशुधनाची संख्या व उपलब्ध पशुवैद्यक तसेच दरवर्षी शिक्षण घेवून बाहेर पडणारे पशुवैद्यक पदवीधर विचारात घेता पशुवैद्यकांची कमतरता भरून काढण्यासाठी या दूरदर्शी निर्णयाचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत घोषणा केली होती.  शेतकरी, विद्यार्थी, पशुपालक यांना  यामुळे फायदा होणार असून पशुपालनाच्या जोड व्यवसायात वाढ होऊन शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले शासकीय पशुवैद्यक पदवी महाविद्यालय असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काळात पशुवैद्यकशास्त्रातील पदवीधरांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध असल्याने भविष्यातील गरज ओळखून अहमदनगर जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन येथे शासकीय पदवी महाविद्यालयाचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शासनस्तरावर सादर केला होता. काल मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मान्यता देण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी येथील मौ. सावळी विहिर खुर्द येथे सुमारे 75 एकर जमिनीवर हे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाकरिता शिक्षक संवर्गातील 96 पदे व शिक्षकेत्तर संवर्गातील 276 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मनुष्यबळ व कार्यालयीन खर्चासाठी रु.107.19 कोटीच्या आवर्ती खर्चास तसेच बांधकामे व उपकरणे यासाठीच्या रु.385.39 कोटी अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकुण रु. 492 कोटीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

Web Title: Cabinet approves 492 crore proposal for veterinary degree college to be set up in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.