Join us

जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:51 IST

Cancer In Animals : मानवांप्रमाणेच, जनावरांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो आणि जनावरांमध्ये विविध अवयवांमध्ये दिसून येतो.

मानवांप्रमाणेच, जनावरांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो आणि जनावरांमध्ये विविध अवयवांमध्ये दिसून येतो.

त्यामुळे जागतिक कर्करोग दिन साजरा करीत असताना जनावरांतील कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आणि तो टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन, जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

४ फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जात आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश देशात कर्क रोगाचे प्रमाण वाढत असताना जनतेला कर्करोगाची लक्षणे, निदान, उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देणे आहे.

जनावरांना होणाऱ्या कर्करोगाबाबतही शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

रोग प्रकार

त्वचा कॅन्सर, स्तन ग्रंथी कॅन्सर (गाई, म्हशी, कुत्री), हाडाचा कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर, शिंगाचा कॅन्सर (गाई, बैल), गर्भाशयाचा कॅन्सर, होडजकिन लिम्फोडेमा.

लक्षणे

गाठी किंवा सूज, वजन कमी होणे, कमी खाणे-पिणे, काम करण्याची शक्ती कमी होणे, थकवा, उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी.

प्रतिबंधात्मक उपाय

नियमित पशू तपासणी, निरोगी आहार, प्रदूषणापासून संरक्षण.

कर्करोगाचे दोन प्रमुख प्रकार

बिनिग्न कॅन्सर

हळूहळू वाढणारा हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरत नाही. याला शस्त्रक्रियेने काढता येतो आणि त्यानंतर पुन्हा होण्याची शक्यता कमी असते.

मॅलिग्नंट कॅन्सर

जलद गतीने वाढणारा आणि शरीराच्या इतर भागात पसरणारा कर्करोग. याचा धोका गंभीर असतो आणि त्यासाठी किमोथेरपी, रेडिएशन थेरपी यांसारख्या उपचारांची आवश्यकता असते.

जनावरांमध्येही कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. खबरदारी म्हणून कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे ओळखण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. - डॉ. विनोद जानोतकर, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद.

हेही वाचा : Dairy Animal Breeding : उच्च दूध उत्पादनाची कालवड आता गोठ्यातच तयार होणार; 'या' सिमेन स्टेशनची मिळणार घरपोहच सेवा

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीगायआरोग्यकॅन्सर जनजागृती