Join us

चाऱ्यासाठी पशुपालकांची वणवण भटकंती, टंचाईची झळ त्यात दुध व्यवसायाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 4:00 PM

दुधाच्या भावात घसरण; पशुखाद्याच्या भावात वाढ

राज्यात चारा प्रश्न गंभीर स्वरूप घेत असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह, बाभूळगाव बु, भायगाव, वरखेडी, गेवराई सेमी, निल्लोड आदी परिसरात यंदा पाऊस म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे खरिप हंगामातील पिके घेता न आल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे पशुपालकांना चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

यावर्षी बनकिन्होळा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. यामुळे नदी- नाल्यांना पूर आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मका, सोयबीन व बाजरी आदी पिके घेता आली नाहीत. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे खरिप हंगाम वाया गेला. अशा परिस्थितीत जणावरांना चारा कोठून आणायचा हा मोठ्या प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे आगामी काळात गुरांना चारा उपलब्ध करण्यासाठी पशुपालकांची शोधाशोध सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात चारा टंचाईची झळ बसू नये, यासाठी पशुपालक मिळेल त्या भावाने चारा खरेदी करीत आहेत.

राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, उपाययोजनेसाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापनादुधाच्या भावात घसरण; पशुखाद्याच्या भावात वाढ

दुधाच्या भावात घसरण तर दुसरीकडे पशुखाद्याच्या भावात वाढ झाल्यामुळे लोणी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक पशुखाद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लोणी खुर्द परिसरात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे चाऱ्याच्या भावात वाढ झाली आहे. • पशुखाद्याचे भावही गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पशुधन कसे जगवायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे पशुधन जतन करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी ३६ रुपयांपर्यंत गेलेले गायीच्या दुधाचे दर आता २५ ते २६ रुपये प्रति लिटरपर्यंत आले आहेत. त्यामुळे पशुपालक अडचणीत सापडले आहेत.

'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप

यावर्षी जेमतेम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच, पण जनावरांना किमान चार महिने पुरेल इतकाही चारा शेतातून मिळालेला नाही. त्यामुळे मिळेल त्या दराने चारा खरेदी करावा लागत आहे. - गुड्डू फरकाडे, शेतकरी, बनकिन्होळा

कोविड प्रकोपानंतर मागील वर्षी प्रथमच दूध व्यवसायात उभारी आली आणि दुधाचे दर ३८ ते ४० रुपये झाले. परिणामी कोविडमध्ये उद्ध्वस्त झालेला शेतकरी व तरुण या व्यवसायात मोठ्या संख्येने उतरला. लाखो रुपये किंमतीच्या संकरीत दुधाळ गायी व म्हशी खरेदी करून आपल्या संसाराची विस्कटलेली घड़ी बसवण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण हा आनंद चिरकाल न राहता त्यावर विरजण पडले.

दुधाळ जनावरांची होतेय कवडीमोल दराने विक्री, चारा टंचाई, घसरलेल्या दुध दरामुळे शेतकऱ्यांची काेंडी

आधीच उत्पन्न कमी त्यात पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी वणवण करावी लागते की काय या भितीने आता शेतकरी एक किंवा दोन दुधाळ जनावरे राखून उर्वरित जनावरांची विक्री करत आहे. ज्यामुळे बैल, गाय, म्हैस आदींची गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. 

पशुपालक गणेश माधवराव जाधव म्हणाले, पशुस्वाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे दुधाचे दर झपाट्याने खाली आले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालकांना पशुधन विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

राज्यात किती चारा शिल्ल्क?

राज्यातल्या पधुधन जगवण्यास वार्षिक १ हजार ३३४.१३ लक्ष मे.टन ऐवढ्या हिरव्या चारा लागतो. तसेच ४२५.७७ मे. टन वाळलेला चारा लागतो. राज्यात यंदा केवळ ७४७.३७ मे. टन हिरवा चारा व ३२१.०५ मे. टन वाळलेला चारा शिल्लक आहे. हिरव्या चाऱ्याची ४३ टक्क्यांहून अधिक चारा तूट तर वाळलेल्या वैरणीची २५.१२ टक्के तूट यंदा निर्माण झाली आहे.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधपाऊसपैसा