Join us

चारा, पाण्याच्या समस्येमुळे जनावरांची विक्री वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 1:00 PM

जत तालुक्याच्या वाट्याला आलेले दुष्काळाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्यावाचून जिथे माणसं तहानली तेथे जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून? अशी स्थिती आहे. पाण्यावाचून दावणीला बांधलेली जनावरे तहानलेली आहेत.

जत तालुक्याच्या वाट्याला आलेले दुष्काळाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्यावाचून जिथे माणसं तहानली तेथे जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून? अशी स्थिती आहे. पाण्यावाचून दावणीला बांधलेली जनावरे तहानलेली आहेत.

तापलेल्या उन्हात घशाला कोरड पडू लागली असून जनावरांच्या तोंडाला येणारा फेस पाहवत नसल्याने पशुपालकांवर जनावरे विक्रीला काढण्याची वेळ आली आहे. जत तालुक्यात सातत्याने दुष्काळाची कमी अधिक झळ सोसावी लागली आहे.

गतवर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे बहुसंख्य गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. पाणी व चाराटंचाईमुळे जत व माडग्याळ येथे जनावर बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आणताना दिसत आहेत. गाय, म्हैस, रेडकू व शेळ्या यांचे पालन पोषण करणे होत नसल्याने ते विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे.

जत तालुक्यातील ६५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ५५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन जत तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली असून, दुष्काळग्रस्तांच्या सवलती जाहीर झाल्या आहेत. अत्यल्प पावसामुळे भूजलपातळी खालावली असल्याने पाणी शोधण्यासाठी ग्रामस्थ भटकंती करत आहेत.

पाण्याचे स्रोत कमीटँकर भरतात तेथेही पाण्याचे स्रोत कमी झाले असल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचे आदेश प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी दिले आहेत. मात्र, लोकांना पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांना कोठून आणणार? यामुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गतवर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. पाणी व चाराटंचाईमुळे जत व माडग्याळ येथे जनावर बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आणताना दिसत आहेत. गाय, म्हैस, रेडकू व शेळ्या यांचे पालन पोषण करणे होत नसल्याने ते विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे.

अधिक वाचा: वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम

टॅग्स :बाजारगायदुग्धव्यवसायदुष्काळपाणीजाटशेतकरी