Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > जनावरांतील वंध्यत्वाची कारणे व उपाय

जनावरांतील वंध्यत्वाची कारणे व उपाय

Causes and remedies of infertility in livestock | जनावरांतील वंध्यत्वाची कारणे व उपाय

जनावरांतील वंध्यत्वाची कारणे व उपाय

पशुपालन करताना अनेक समस्या येतात ज्यामुळे पशुपालकांचे भरपूर आर्थिक नुकसान होते जसे दगडी, स्तनदाह, गोचीड ताप, समतोल आहार न मिळणे आणि प्रजनच्या येणाऱ्या समस्या. यातील प्रजानाची समस्या ज्यामुळे जगभरात २६% आर्थिक नुकसान हे पशुपालकांचे होते.

पशुपालन करताना अनेक समस्या येतात ज्यामुळे पशुपालकांचे भरपूर आर्थिक नुकसान होते जसे दगडी, स्तनदाह, गोचीड ताप, समतोल आहार न मिळणे आणि प्रजनच्या येणाऱ्या समस्या. यातील प्रजानाची समस्या ज्यामुळे जगभरात २६% आर्थिक नुकसान हे पशुपालकांचे होते.

शेअर :

Join us
Join usNext

पशुपालन करताना अनेक समस्या येतात ज्यामुळे पशुपालकांचे भरपूर आर्थिक नुकसान होते जसे दगडी, स्तनदाह, गोचीड ताप, समतोल आहार न मिळणे आणि प्रजनच्या येणाऱ्या समस्या. यातील प्रजानाची समस्या ज्यामुळे जगभरात २६% आर्थिक नुकसान हे पशुपालकांचे होते. पशुपालनात प्रजनन हे उत्पादनाचा कणा आहे प्रजनन दर गाठण्यासाठी गायी-म्हशींना आजारांपासून मुक्त ठेवणे, त्यांना उत्तम प्रकारचा सकस आहार देणे, खनिज मिश्रणाची कमतरता नसणे, स्पष्ट माजाची लक्षणे दिसणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. जनावरांमधील वंध्यत्वावर वेळेवर उपचार केल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहते. जनावरांमध्ये दोन प्रकारची वंधत्व होते कायम स्वरुपी आणि तात्पुरते.

कायम स्वरुपी वंधत्त्व
-
आनुवंशिक
- गर्भाशयातील विकृती
- व्यंगन्मजात गर्भाशयातील रचनात्मक दोष
- सदोष बीजांडे
- सदोष गर्भाशयमुख
अशी जनावरे प्रजननांसाठी कायमची सक्षम नसतात. त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही.

तात्पुरते वंध्यत्व
-
कुपोषण
- गर्भाशय संसर्ग
- अनियमित लैंगिक चक्र
- मादीमधील बीजांड दोष
- बीजकोशचा आकार
- संप्रेरकामधील असमतोलपणा
- व्यवस्थापकीय चुका
- पशुखाद्याचे अयोग्य नियोजन
- माजाचे अयोग्य व्यवस्थापन
- नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाचे अयोग्य व्यवस्थापन

तात्पुरते वंधत्व टाळण्यासाठी उपाय
जनावरांना दर तीन महिन्यांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
- जनावरांना नियमित लसीकरण करावे.
- मादी वासरांना योग्य आहार देऊन त्याची वेळेवर पौगंडावस्था गाठता येते. गाईमध्ये २३० ते २५० किलो आणि म्हशीमध्ये ३०० ते ३५० किलो वजन हे पौगंडावस्थेसाठी आदर्श आहे. जे प्रजननासाठी आणि योग्य गर्भधारणेसाठी आवश्यक आहे.
- आहारामध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, खनिजे, ऊर्जा तसेच इतर घटकांचे प्रमाण योग्य स्वरूपात असावे. जनावरांना खाद्यातून दररोज २५ ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण पुरवावे.
- लैंगिक चक्र कालावधीच्यात दरम्यान प्रजनन करावे.
- ज्या प्राण्यांमध्ये लैंगिक चक्र दिसत नाही किंवा माज येत नाही त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करावेत.
नैसर्गिक सेवेमध्ये जन्मजात दोष आणि संसर्ग टाळण्यासाठी बैलाचा प्रजनन इतिहास खूप महत्त्वाचा असतो.
- गाईची प्रसूती स्वच्छ जागेमध्ये केल्याने गर्भाशयाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात टाळता येतात.
- गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अनियंत्रित ताण आणि वाहतूक टाळावी.
- बचतपूर्ण आणि नफादायक दुग्धशेतीसाठी दरवर्षी एक पाडस हा दर गाठण्यासाठी प्रसूतीनंतर चार महिने ते १२० दिवसांच्या आत प्रजनन सुरु करावे.

डॉ. प्रियांका तोंडे
डॉ. महेश धनगर

प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, संभाजीनगर

Web Title: Causes and remedies of infertility in livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.