नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमात (एलएचडीसीपी) सुधारणांना मंजुरी दिली.
या योजनेत तीन घटक आहेत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण आणि पशुवैद्यकीय औषधे. एलएचडीसीपी योजनेत पशुवैद्यकीय औषधांचा समावेश एक नवीन घटक म्हणून करण्यात आला आहे.
या योजनेचा एकूण खर्च दोन वर्षासाठी म्हणजेच २०२४-२५ आणि २०२५-२६ साठी ३८८० कोटी रुपये आहे, ज्यामध्ये चांगल्या दर्जाच्या आणि परवडणाऱ्या जेनेरिक पशुवैद्यकीय औषधांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी पशू औषध घटकांतर्गत ७५ कोटी रुपयांची तरतूद समाविष्ट आहे.
आजारांमुळे जनावरांच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. एलएचडीसीपीच्या अंमलबजावणीमुळे लसीकरणाद्वारे रोग रोखून हे नुकसान कमी होईल.
अशाप्रकारे ही योजना लसीकरण, देखरेख आणि आरोग्य सुविधांचे अपग्रेडेशन याद्वारे पशुधन रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यास मदत करेल.
या योजनेमुळे उत्पादकता वाढेल, रोजगार निर्माण होईल, ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना मिळेल आणि रोगांच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.
अधिक वाचा: जनावराने प्लास्टिक, लोखंडी वस्तू खाल्ल्या तर कसे ओळखाल? कशी दिसतात लक्षणे? वाचा सविस्तर