इरफान सय्यद
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ९ पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधनासाठी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे अठरा हजार 'टॅग' उपलब्ध झाले होते. टॅग मिळताच पशुधन विकास अधिकारी यांनी मोहीम सुरू करत १८ हजार शेळ्यांना इअर टॅगिंग केले आहे.
सोबतच परिसरातील इतर जनावरांची नोंद व इअर टॅगिंगचे कामदेखील सुरू करण्यात आले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या पशूना इअर केल्याशिवाय खरेदी करता येणार नाही. १ नियम लागू करण्यात अथवा विक्री जूनपासून हा आला आहे. भारत पशुधन प्रणालीवर करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पशुधनाची नसेल त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय सेवाही दिली जाणार नाही.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन नॅशनल डिजिटल लाइव्ह मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत टॅगिंगची नोंद घेण्यात येत आहे. यात जन्म-मृत्यू नोंदणी, व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हस्तांतरण यांचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभाग अंबडचे सहायक पशुसंवर्धन डॉ. अभिजित इंगळे, पशुधन विकास अधिकारी वि. योगेश अक्षेय, डॉ. सचिन पैठणकर, पशुधन पर्यवेक्षक नालेवाडी यांनी शुक्रवारी अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील मराठवाडा शेळी पालन केंद्राला भेट देऊन गॉटफार्मिंगमधील शेळ्यांना 'इअर टॅगिंग' केले. दरम्यान उपस्थित पशुपालकांना पशुंची नोंद करून 'इअर टॅगिंग' करून घ्यावी असे आवाहन केले.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तालुक्यातील प्रत्येक पशुपालकाने पशुंची नोंद करून 'इअर टॅगिंग' करून घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनासाठी मिळणारा कुठलाही लाभ देण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व पशुपालकांना याकडे दुर्लक्ष न करता आपल्याकडी असलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग करून घ्यावी. - डॉ. योगेश अक्षेय, पशुधन विकास अधिकारी, अंबड.
हेही वाचा - Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात