Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार

गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार

Cow buffalo eats fodder after delivery but does not eat any livestock feed; could this be a disease? Get treatment immediately | गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार

गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार

अनेक वेळा आपण पाहतो की गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर इतर सर्व म्हणजे वाळलेली वैरण, हिरवी वैरण खात असते पण भरडा, पेंड, पशुखाद्य खात नाही. व्यवस्थित व्यालेली असते. शरीराचे तापमान सामान्य असते. वार पडलेली असते. रवंत करत असते. पण भरडा खात नाही.

अनेक वेळा आपण पाहतो की गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर इतर सर्व म्हणजे वाळलेली वैरण, हिरवी वैरण खात असते पण भरडा, पेंड, पशुखाद्य खात नाही. व्यवस्थित व्यालेली असते. शरीराचे तापमान सामान्य असते. वार पडलेली असते. रवंत करत असते. पण भरडा खात नाही.

शेअर :

Join us
Join usNext

अनेक वेळा आपण पाहतो की गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर इतर सर्व म्हणजे वाळलेली वैरण, हिरवी वैरण खात असते पण भरडा, पेंड, पशुखाद्य खात नाही. व्यवस्थित व्यालेली असते. शरीराचे तापमान सामान्य असते. वार पडलेली असते. रवंत करत असते. पण भरडा खात नाही.

अनेक पशुपालकांना असा अनुभव आला असणार. खरंतर हा एक चयापचयाचा आजार आहे. याला ‘किटन बाधा’ किंवा ‘किटोसिस’ असे म्हणतात. त्याचे तीन-चार प्रकार आहेत.

पण मुख्य लक्षण एकच असते ते म्हणजे आंबोन भरडा खात नाही आणि त्यामुळे दूध वाढत नाही. इतर लक्षणांमध्ये मग दूध, लघवी याला गोड वास येतो.

ketosis किटोसिस आजाराची लक्षणे
- श्वासोच्छवासाला देखील गोड वास येतो.
- काही वेळा मेंदू चा सहभाग असेल तर गोल गोल फिरणे, चालताना अडखळणे.
- दावनीला डोकं लावून उभे राहणे, दृष्टी कमी होणे, मोकळ्या गोठ्यात, कुरणात भटकत राहणे.
- शरीराला किंवा दावणीला चाटणे अशी लक्षणे दाखवली जातात.

किटोसिस आजार कशामुळे
-
गाभणकाळात गाय किंवा म्हैस आठवल्यानंतर त्याला भरपूर असा गाभण काळातील आहार देणे आवश्यक असते.
- अनेक वेळा तो दिला जात नाही. दिला तरी वासराची वाढ त्या काळात होत असल्याने रवंत देखील कमी होत असतो.
- सोबत आहार देखील कमी घेतला जातो. त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. जनावर अशक्त होते.
- पुन्हा व्याल्यानंतर गाय किंवा म्हैस जास्तच अशक्त दिसायला लागते. अगदी सर्वच बरगड्या स्पष्ट दिसायला लागतात.
- त्यातच पहिल्या आठ-दहा दिवसात व्यायच्या ताणामुळे एकूणच कमी आहार घेतला जातो.
- रवंत, दूध वाढ, हालचाल यासाठी ऊर्जा लागते. ती कमी प्रमाणात मिळते.
- मग ती भरून काढण्यासाठी शरीरातील फॅट (चरबी) वापरली जाते. त्याच्या विघटनातून ऊर्जा निर्माण होत असते.
- त्याच वेळी शरीरात किटोन बॉडी तयार होतात. त्या लघवी, दूध, लाळेद्वारे बाहेर टाकल्या जातात.
- जादा निर्माण झाल्यास वर सांगितल्याप्रमाणे लक्षणे दाखवायला सुरुवात होते.

किटोसिस आजारासाठी उपचार
- यासाठी तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात तात्काळ ऊर्जा वाढवणे आवश्यक आहे.
- आज बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. त्याचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा.
- सोबत सलाईनच्या माध्यमातून ग्लुकोज दिल्यास तात्काळ फरक पडतो.
- पण हा आजार होऊच नये यासाठी गाभण काळात आटल्यावर नियमित गाभण काळातील खुराक द्यावा. तो बंद करू नये.
- बंद केल्यास ऊर्जा संचय कमी होतो. तो योग्य प्रमाणात शरीरात टिकून राहीला पाहिजे.
- याचा अर्थ गाभण काळातील खुराक जादा देऊन जनावर फॅट किंवा चरबीयुक्त करू नये. त्यामुळे देखील किटोसिस होतो.
- नेहमी लक्षात ठेवा शेवटच्या दोन बरगड्या आपल्याला स्पष्ट दिसायला हव्यात. हाताळता याव्यात.

आता आजाराची आपल्याला ओळख झाली असेल. पण अंतिम निदान पशुवैद्यकानां करू द्या. उपचारही तज्ञ पशुवैद्यकाकडून करून घ्यायला विसरू नका.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: जनावरांनाही होतो कॅन्सर; त्याचे प्रकार कोणते आणि तो कसा ओळखाल? वाचा सविस्तर

Web Title: Cow buffalo eats fodder after delivery but does not eat any livestock feed; could this be a disease? Get treatment immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.