Join us

गुरांना ऑक्सिटोसीन इंजेक्शन देणाऱ्या दूध विक्रेत्यावर गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:19 PM

जिल्हा दूध भेसळ समिती व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोठ्यावर धाड टाकून ही कारवाई केली.

नाशिक : विनालेबल असलेले ऑक्सिटोसीन हे घातक इंजेक्शन दूध वाढविण्यासाठी गाय व म्हशीला देऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याबद्दल दूध व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा दूध भेसळ समिती व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोठ्यावर धाड टाकून ही कारवाई केली.

हारक यांनी याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आनंद डेअरीचे संचालक आनंद वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूध वाढविण्यासाठी जनावरांना घातक इंजेक्शन देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र हे दूध त्रासदायक ठरू शकते, ऑक्सिटोसीन या औषधांचा वापर जनावरांसाठी करण्यात येत होता, मानवी आरोग्यास अशा पद्धतीचे दूध हानीकारक असतानाही औषधाचा वापर वर्मा यांनी केला. ते औषध देखील विनालेबलचे होते. त्या अर्थी ते औषध देखील कंपनीच्या नावाखाली भेसळयुक्त वापरात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्या अनुशंगाने औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्यांतर्गत करण्यात आला. गुन्हा दाखल

काय आहे 'ऑक्सिटोसीन'?

  • ऑक्सिटोसीन हे एक हार्मोन आहे. प्रसूतीदरम्यान महिलांना हे इंजेक्शन दिले जाते. हे लाईफ सेव्हिंग्ज म्हणून ओळखले जाते. 
  • हे इंजेक्शन दिलेल्या जनावराचे दूध प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
  • औषध प्रशासनाचे निरीक्षक प्रवीण पोटात दुखणे, मळमळ, कमजोरी होऊ शकते. जनावरांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा औषधावर निर्बंध होते.
टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायशेतकरीप्राण्यांवरील अत्याचार