Join us

Dairy Animal Breeding : उच्च दूध उत्पादनाची कालवड आता गोठ्यातच तयार होणार; 'या' सिमेन स्टेशनची मिळणार घरपोहच सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 9:55 AM

अलीकडे दूध दर (Milk Rate) कमी झाल्याने दूध उत्पादक (Milk Producer) शेतकरी (Farmer) मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यासोबतच विविध आजारांमुळे गाई-म्हशींवर होणारा खर्च वाढत आहे, ज्यामुळे काही शेतकऱ्यांना दूध व्यवसायातून माघार देखील घ्यावी लागते. अशावेळी भविष्यात दूध व्यवसाय टिकवण्यासाठी लिंगवर्धित रेतन मात्रा (Sex Sorted Semen) वापरून उच्च दर्जाचे कालवडी तयार करणे आवश्यक आहे.

अलीकडे दूध दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यासोबतच विविध आजारांमुळे गाई-म्हशींवर होणारा खर्च वाढत आहे, ज्यामुळे काही शेतकऱ्यांना दूध व्यवसायातून माघार देखील घ्यावी लागते. अशावेळी भविष्यात दूध व्यवसाय टिकवण्यासाठी लिंगवर्धित रेतन मात्रा वापरून उच्च दर्जाचे कालवडी तयार करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय डेयरी विकास बोर्डांतर्गत (NDDB) २०१६ साली स्थापन झालेल्या राहुरी सीमेन स्टेशनने (Rahuri Semen Station) याच कामासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले आहे. यामध्ये उच्च अनुवांशिक गुणवत्ता असलेल्या वीर्य डोस, कृत्रिम गर्भधान, भ्रूण हस्तांतरण, प्राणी पोषण सेवा आणि एसएजी लाइव्ह ब्रॅंड अंतर्गत उच्च गुणवत्तेच्या जनावरांचा घरपोच पुरवठा यासारख्या विविध सेवांचा पुरवठा खाजगी कंपन्यांच्या तुलनेत माफक दरात उपलब्ध आहे.

डेन्मार्क आणि जर्मनी येथून उत्कृष्ट एच एफ व जर्सी वळू आयात करत स्वदेशी साहीवाल, गिर, थारपारकर, देवणी, लाल कंधार यासारख्या विविध जातींच्या वळूंचे संगोपन या सीमेन स्टेशनमध्ये केले जाते. यामधून शेतकऱ्यांना वीर्य मात्रा पुरविल्या जातात, ज्यामध्ये म्हैस वर्गीय मुऱ्हा, जाफरबादी, पंढरपुरी जातींचा देखील समावेश आहे.

यंदा राहुरी सीमेन स्टेशनने १.५ लक्ष वीर्य मात्रा उत्पादन करण्याचा मानस केला आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये त्यांचे कार्य चालू आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट राहुरी सीमेन स्टेशनच्या उपक्रमाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या या सेवांमुळे दूध व्यवसायाला नवी संजीवनी मिळणार आहे.

शेतकऱ्यांना थेट गोठ्यावर या सुविधा मिळविण्यासाठी राहुरी सीमेन स्टेशनने काही संपर्क आहेत ज्याद्वारे शेतकरी त्यांना संपर्क करू शकतात. ते पुढीलप्रमाणे दूरध्वनी ०२४२६२९९००१, वितरण अधिकारी ८९५६२१६१३७. यासोबत rahurisemenstation.com या संकेतस्थळाचा उपयोग करून अधिक माहिती मिळवू शकतात.

हेही वाचा : दुचाकीवर दररोज ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करत शेतकऱ्यांच्या पशुधनास जीवदान देणारी महिला पशुवैद्यक

टॅग्स :गायदूधशेतकरीराहुरीअहिल्यानगरशेतीशेती क्षेत्र