पुणे : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झालेली असून राज्यात येणाऱ्या तीन ते चार दिवसांत सर्वत्र पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या हंगामामध्ये पाळीव प्राण्यांमध्ये साथीचे रोग झपाट्याने पसरतात. त्यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने मोहीम काढली असून राज्यातील बहुतांश जनावरांचे लसीकरण केले आहे. त्याचबरोबर ११ जिल्ह्यांना ९ साथीच्या रोगांसंदर्भात सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून प्रत्येक महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांना रोग प्रादुर्भाव सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्याप्रमाणे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याकरिता ९ रोगांसाठी राज्यातील ११ जिल्ह्यातील पशुपालकांना इशारा देण्यात आला असून या शेतकऱ्यांनी आपापल्या पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या रोगाचा इशारा?
रोगाचे नाव - जिल्हा
जून २०२४
घटसर्प - बीड
शेळ्या-मेंढ्यांचा देवी - पुणे
जुलै - २०२४
घटसर्प - अहमदनगर, अकोला, अमरावती व नाशिक
फऱ्या - अहमदनगर
पीपीआर - अहमदनगर व पुणे
ऑगस्ट २०२४
लाख खुरकूत - अहमदनगर
घटसर्प - जळगाव
फऱ्या - लातूर
पीपीआर - अहमदनगर, धाराशिव, सांगली व वर्धा
कुठे किती झाले लसीकरण? वाचा सविस्तर
पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम
पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांनीही आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.