Join us

Dairy Farming : हरियाणातील गायीच्या प्रेमात पडले शेतकरी; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:30 IST

Dairy Farming : शेतकरी १६०० किलोमीटर दूरवर जाऊन हरियाणातील गायींच्या प्रेमात पडलेले चित्र सध्या दिसून येत आहे. काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

नितीन कांबळे

आष्टी तालुक्यात रोजगारासाठी औद्योगिक वसाहत आणि कायमस्वरूपी सिंचन योजना नसल्याने शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसायाकडे (Dairy Farming) वळलेला आहेत.

सद्यः स्थितीत तालुक्यात दररोज हजारो लिटर दूध उत्पादन होत आहे. यात वाढ करण्यासाठी व जास्त दूध देणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणातील गायी तालुक्यातील शेतकरी आणत आहेत. (Dairy Farming)

तालुक्यातील अनेक शेतकरी १६०० किलोमीटर दूरवर जाऊन हरियाणातील गायींच्या प्रेमात पडलेले चित्र सध्या दिसून येत आहे. या गायी दररोज ३० ते ३५ लिटरपर्यंत ही दूध देत असल्याने भविष्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी तरुणांनी पशुपालन व्यवसाय सुरू केला असून, दुधाळ असलेल्या हरियाणाच्या गायी आणून दुग्ध व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Dairy Farming)

आष्टी तालुक्याची अर्थव्यवस्था ही दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाने आधार दिला आहे. आता याच व्यवसायात नव युवकांनी प्रवेश करत वेगवेगळ्या जातीच्या गायी खरेदी करून दूध उत्पादन वाढवून चार पैसे आणखी कसे मिळतील, असे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. (Dairy Farming)

दुधाळू गायी

* सध्या आपल्या भागातील गायी दररोज १५ ते २० लिटर दूध देतात; परंतु पंजाब व हरियाणा राज्यांमध्ये सुधारित व राष्ट्रीय दर्जाचे रेतन पद्धती असल्याने तेथील गायींची पैदास ही दुधाळू गायी म्हणून परिचित झाली आहे.

* पंजाब व हरियाणामधील गायी दररोज ३५ ते ४० लिटर दूध देत असून आपल्या गायीपेक्षा निम्म्याने जास्त दूध उत्पादन त्या देतात.

चाराही हिशोबातच

* महाराष्ट्रातील गायी साधारणपणे वर्षभरात साडेतीन हजार ते चार हजार लिटरपर्यंत दूध देतात. मात्र, पंजाबमधील गायी या सहा हजार ते आठ हजार लिटर एका वर्षाला दूध देतात.

* चाराही तेवढाच लागतो. मात्र, उत्पादन दुपटीने जास्त होत असल्याने या गायी खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

पाच दिवस चार रात्रींचा प्रवास

* पंजाब किंवा हरियाणावरून गायी आष्टी तालुक्यापर्यंत आणण्यासाठी पाच दिवस व चार रात्रींचा प्रवास करावा लागतो.

* येताना फक्त रात्रीचा प्रवास करून दिवसभर गायींना जागोजागी उतरून ठेवले जाते. त्या ठिकाणी त्यांना दिवसभर चारापाणी देऊन रात्री प्रवासाला सुरुवात करण्यात येते.

*अखेर पाचव्या दिवशी आष्टी तालुक्यापर्यंत म्हणजेच १६०० किलोमीटर अंतर पार करून त्या गायी तालुक्यात दाखल होत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : केंद्र सरकारचा पशुवैद्यकीय औषधांबाबत मोठा निर्णय; पशुपालकांना होणार असा फायदा

टॅग्स :शेती क्षेत्रगायदुग्धव्यवसायशेतीशेतकरी